January 8, 2025 2:48 pm

शिरपूर येथे महाराणा प्रताप संस्था आयोजित ‘संस्कार शिबीर’ संपन्न

अपनी भाषा में पढ़े! Translate

शिरपूर येथे महाराणा प्रताप संस्था आयोजित ‘संस्कार शिबीर’ संपन्न

शिरपूर प्रतिनिधी : तालुक्यातील ‘महाराणा प्रताप क्षत्रिय राजपूत समाज संस्था’ शिरपूर आयोजित क्षत्रिय युवा संस्कार शिबिराचे आयोजन स्व इंद्रसिंग भाऊसाहेब मेमोरियल हॉल, राजपूत भवन येथे संपन्न झाले.

संस्कार शिबिरांस राजस्थान येथील श्री रामराज्य मिशनचे राष्ट्रीय अध्यक्ष राजऋषी कुंवर श्री राजेंद्रसिंहजी नरुका व मथुरा येथील श्रीकृष्ण जन्मभूमी आंदोलनाचे मुख्य पक्षकार व सुप्रसिद्ध कथावाचक परमपूज्य कौशल किशोर ठाकूरजी महाराज यांनी मार्गदर्शन केले. प्रमुख अतिथी म्हणून आमदार श्री काशिरामदादा पावरा व राजपूत समाजाचे राजकीय-सामाजिक नेते उपस्थित होते.

आपल्या मार्गदर्शनात त्यांनी सांगितले की मुलांवर संस्कार हे त्यांच्या आईच्या गर्भातच सुरु होतात. अभिमन्यूला आईच्या गर्भातच संस्कार मिळाले. मातृशक्ती मध्ये संस्काराची खूप मोठी ताकद असते आणि तेथूनच आदर्श संस्कार मिळतात म्हणून प्रत्येक आई ही सुसंस्कृत व स्वतः संस्कारसंपन्न असली पाहिजे तेव्हाच ती पुढच्या पिढीला चांगले संस्कार देऊ शकते. आयुर्वेद शास्त्रातील ‘गर्भ संस्कार’ या ग्रंथाचे वाचन व श्रवण झाले पाहिजे.

संस्कार शिबीरांस संस्थेचे विश्वस्त मंडळ, सभासद, युवक-युवती, महिला व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रास्ताविक महाराणा प्रताप संस्थेचे अध्यक्ष श्री संग्रामसिंग सरदारसिंग राजपूत यांनी तर आभार प्रदर्शन संस्थेचे उपाध्यक्ष श्री योगेंद्रसिंग दाजभाऊ सिसोदिया यांनी केले. सुरत येथील साईधारा ग्रुपचे श्री रविशेठ राजपूत यांचे विशेष आभार मानण्यात आले ज्यांच्या सहकार्यामुळे प्रमुख मार्गदर्शक लाभू शकले. सूत्रसंचालन श्री गणेश चौधरी सरांनी केले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!