संत सदगुरु सखाराम महाराज विठ्ठल रुक्माई संस्थान अमळनेर: पंढरपूर प.पू. गुरुवर्य प्रसाद महाराज यांच्या परतीच्यावारीचे उद्या अमळनेरात होणार आगमन
अमळनेर : विक्की जाधव
दि. 26 डिसेंबर 2024 रोजी, संत सद्गुरु सखाराम महाराज विठ्ठल रुक्माई संस्थान अमळनेरच्या वतीने प.पू. गुरुवर्य प्रसाद महाराज यांची परतीची वारी उद्या अमळनेर नगरीत येणार आहे. या वारीचे आगमन दुपारी 11:30 वाजता होईल. यासाठी वाडी संस्थान येथे जय्यत तयारी कारण्यात आली आहे.
तर दुसऱ्या दिवशी सलाबादाप्रमाणे शुक्रवार, दि. 27 डिसंबर 2024 रोजी, अंबऋषी टेकडी येथे संध्याकाळी 06:30 वाजता खिरापतीच्या काला भजनाचे आयोजन करण्यात आले आहे.
यावर्षीच्या कार्यकमामध्ये होणार बदल:
सोमवार, दि. 30 डिसेंबर 2024 रोजी, संत सखाराम महाराज समाधी मंदिर येथे अमावस्या काला भजन आयोजित करण्यात येईल. हे भजन सकाळी 11:00 ते 12:00 या वेळेत होईल.