June 29, 2025 2:23 am

प्रताप महाविद्यालयाचे क्रिकेट स्पर्धेत विजेतेपद 

अपनी भाषा में पढ़े! Translate

प्रताप महाविद्यालयाचे क्रिकेट स्पर्धेत विजेतेपद 

 

अमळनेर : विक्की जाधव.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत एरंडोल विभाग द्वारा आयोजित आंतर महाविद्यालयीन क्रिकेट पुरुष व महिला स्पर्धेत प्रताप वरिष्ठ महाविद्यालयातील महिला व पुरुष संघाने विजेतेपद पटकावले.एरंडोल विभागातील ९ क्रिकेट संघ यात सहभागी होते.अंतिम सामन्यात प्रताप पुरुष संघाने अभियांत्रिकी महाविद्यालय,बांभोरी जळगांव संघाचा तर प्रतापच्या महिला संघाने महात्मा गांधी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय ,चोपडा संघाचा पराभव केला .रोहित वंजारी, कार्तिक काळे , राहुल पाटील, सुरज मोरे,अनन्या जोशी, सृष्टी शिंदे, भाग्यश्री पाटील, अश्विनी भावसार या प्रतापच्या खेळाडूंनी उत्कृष्ट खेळ केला.आंतर विभागीय क्रिकेट स्पर्धेसाठी सर्व संघातील उत्कृष्ट खेळाडूंची निवड होईल तसेच २६ डिसेंबर ते ३० डिसेंबर दरम्यान या स्पर्धा मुळजी जेठा महाविद्यालय,जळगाव येथे संपन्न होतील.

प्रतापच्या खेळाडूंच्या या यशाबद्दल सर्व प्राध्यापक,शिक्षकेत्तर कर्मचारी,विदयार्थी, खेळाडू यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!