June 28, 2025 10:03 pm

अमळनेर मतदार संघात गेल्या पाच वर्षात एकही आमसभा नाही.

अपनी भाषा में पढ़े! Translate

अमळनेर मतदार संघात गेल्या पाच वर्षात एकही आमसभा घेण्यात आलेले नाही. या संदर्भात अमळनेर विस्तार अधिकारी यांना पत्र : अनंत निकम 

 

अमळनेर : विक्की जाधव 

अमळनेर मतदार संघात साल 2019 ते 2024 तब्बल 5 वर्ष एक देखील आमसभा घेण्यात आली नाही, त्या कारणे सामान्य नागरिक व त्याला येणाऱ्या अडचणी मुळे अमळनेर मतदार संघातील जनता हैराण होत आहे. मागील 5 वर्षात करोना व त्यानंतर अचानक मिळालेले मा. श्री. अनिल भाईदास पाटील यांना कॅबिनेट मंत्रिपद त्यात त्यांना अमळनेर च्या जनतेला देण्या सारखा वेळ नव्हता, पण आता पुन्हा मा. श्री. अनिल पाटील निवडून आले असून आता त्यांना फक्त अमळनेर मतदार संघाची जबाबदारी आहे. म्हणजे मंत्रिपद, प्रतोत अशी कुठलीही जबादारी नसल्याने आता त्यांना नवीन वर्षात आमसभा घेत नवीन वर्षाचे (2025)अमळनेर च्या जनतेचे अडचणी -विवनचना ऐकून घ्याव्यात अश्या अश्याचे पत्र अनंत निकम यांनी अमळनेर विस्तार अधिकारी यांना दिले आहे. असे त्यांनी मार्मिक शी बोलतांना सांगितले.

तसेच आमसभेच्या माध्यमातून जनतेशी सुसवाध साधल्यास अमळनेर मतदार संघातील जनतेला बरे वाटेल.तसेच मा. श्री अनिल पाटील (अमळनेर विधानसभा आमदार )यांनि आमसभा बाबत आपल्या कार्यालयाला जो काही खुलासा देतील त्याची प्रत आपल्या कार्यालय मार्फत निवेदनकर्ता यांना कळवणे क्रमप्राप्त.तसेच मा. आमदार यांनी आमसभा साठी तारीख कळवल्यास आपल्या कार्यालया मार्फत अमळनेर शहरात मोक्याच्या ठिकाणी होर्डिंग लावून, वृतपत्रात सूचित करणे जेणेकरून जनतेला आमसभे बाबत जागृती होऊन अडी -अडचणीच्या पेच्यात अडकलेली जनता मोठ्या संख्येने उपस्तिथ राहील.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!