अखेर दुसऱ्यांदा दत्तात्रय भरणे यांची कॅबिनेट मंत्री पदी निवड;इंदापूर तालुक्यात जल्लोष
(निलेश गायकवाड)
कोणताही राजकीय वारसा नसतानाही एका कार्यकर्त्यांपासून सामाजिक कामांना सुरवात करणारे आमदार दत्तात्रय भरणे यांची पुन्हा एकदा मंत्रीपदी वर्णी लागली आहे. इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे हे शेतकरी कुंटूबातील आहेत. कुंटूबाला कसलाही राजकीय वारसा नाही. आपलं काम व विकासाच्या जोरावर आज त्यांनी मंत्रीपदापर्यंत मजल मारली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर समर्थक व विश्वासू आमदार म्हणून दत्तात्रय भरणे यांची ओळख आहे.
दत्तात्रय भरणे यांच्या मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल इंदापूर तालुक्यामध्ये कार्यकर्त्यांनी फटाके व पेढे भरवत आनंद व्यक्त केला.