December 17, 2024 11:49 pm

‘प्रताप’ च्या आठ विद्यार्थ्यांचे आविष्कार स्पर्धेत यश

अपनी भाषा में पढ़े! Translate

‘प्रताप’ च्या आठ विद्यार्थ्यांचे आविष्कार स्पर्धेत यश

 

अमळनेर : विक्की जाधव 

येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय(स्वायत्त), अमळनेर येथील विद्यार्थी दिनांक 05 डिसेंबर 2024 रोजी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव अंतर्गत अविष्कार स्पर्धेच्या पहिल्या राऊंडसाठी डॉ.दादासाहेब पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, चोपडा या ठिकाणी अविष्कार स्पर्धेची पहिली फेरी संपन्न झाली.या पहिल्या फेरीत प्रताप महाविद्यालयातील एकूण 20 विद्यार्थ्यांनी सक्रियपणे सहभाग घेतला.त्यातील 08 विद्यार्थ्यांची परीक्षकांनी दुसऱ्या राउंड साठी उत्तम सादरीकरणानंतर त्यांची निवड केली.कोड नंबर JPGP3-2401) कुरेशी इरफान2) शीतल पाटील या गणित विभागातील विद्यार्थ्यांनाडॉ.नलिनी पाटील व प्रा.रोहन गायकवाड यांनी मार्गदर्शन केले.कोडं क्रमांक JPGP3-2313 ) सैंदाणे अंकित भूपेंद्र

4) डिंपल दिपक पाटीलया रसायनशास्त्र विषयातील विद्यार्थ्यांनाप्रा .मिलिंद ठाकरे यांनी मार्गदर्शन केले कोडं क्रमांक JPGP6-2355) नेतल माधवानी 6) रोहिणी सोनार

तसेच कोड क्रमांक JPGP3-475 7) धन्वंतरी पवार 8) प्रेरणा लिंगायत या सुक्ष्मजीवशास्त्र विषयातील विद्यार्थ्यांना प्रा.हेमलता सूर्यवंशी यांनी मार्गदर्शन केले.प्रताप महाविद्यालयातील या आठ विद्यार्थ्यांचे आविष्कार स्पर्धेतील समन्वयक व संघ व्यवस्थापक म्हणून रसायनशास्त्र विभागातील सहयोगी प्राध्यापक डॉ.रवी बाळसकर यांनी उत्कृष्टपणे जवाबदारी पार पाडली.त्यांच्या समवेत टीम लीडर म्हणून प्रा.रामदास सुरळकर व प्रा.हेमलता सूर्यवंशी यांनी देखील सक्रियपणे काम पाहिले आणि विद्यार्थ्यांना मूलभूत स्वरूपाचे मागर्दशन केले.

उपरोक्त सर्व पात्र व उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन खानदेश शिक्षण मंडळाचे चिटणीस तथा प्राचार्य डॉ.अरुण जैन, खानदेश शिक्षण मंडळाचे सहसचिव डॉ.धीरज वैष्णव, अंतर्गत गुणवत्ता अभिवचन कक्षचे प्रमुख डॉ.मुकेश भोळे,जेष्ठ प्रा.जयंत पटवर्धन, उपप्राचार्य डॉ.विजय तुंटे, डॉ.हर्षवर्धन जाधव, डॉ.शशिकांत सोनवणे, ग्रंथपाल दिपक पाटील,डॉ.माधव भुसनर,उपप्राचार्य डॉ.योगेश तोरवणे,प्रा.धनंजय चौधरी, डॉ.निलेश पवार,डॉ.कैलास निळे,प्रा.पुष्पां पाटील,प्रा.वृषाली वाकडे,क्रीडा संचालक डॉ सचिन पाटील,संचालक परीक्षा व मूल्यमापन मंडळ प्रा.शशिकांत जोशी,डॉ.आर सी सरवदे,प्रा.देवेंद्र कांबळे,डॉ.विलास गावित,डॉ.बालाजी कांबळे,डॉ.रवींद्र मराठे,प्रा.जयेश साळवे,कुलसचिव राकेश निळे,कार्यालयीन अधिक्षक देवेंद्र कांबळे,वरिष्ठ लिपिक भटू चौधरी,प्रा.उमेश येवले,प्रा.सुधाकर बाविस्कर यांच्यासह उपस्थित सर्व विभाग प्रमुखांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक केले. या यशाबद्दल विद्यार्थ्यांचे संशोधनात भरीव स्वरूपाचे कार्य भविष्यात होऊ शकेल,या पद्धतीचा आशावाद यावेळी व्यक्त करण्यात आला.ही निवड भविष्यातील संशोधनासाठी निश्चितपणे लाभदायक ठरू शकेल,त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यासाठी अशा पद्धतीच्या अविष्कार स्पर्धेचे आयोजन केले जाते.पुढील फेरी ही 18-19 डिसेंबर 2024 रोजी विद्यापीठात होणार आहे.एकूणच, या यशाबद्दल विद्यार्थ्यांचे सर्वत्र स्वागत व अभिनंदन होत आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!