संकट काळी आपल्यासाठी उभा असणाऱ्यालाच अमळनेरात बोलून केला दगा
अमळनेर : विक्की जाधव
अमळनेर येथे एक दुर्दैवी घटना घडली आहे, ज्यात संकटकाळात आर्थिक सहाय्य करणाऱ्या व्यक्तीस फसवण्यात आले आहे. सुनिल मनोहर सोनगिरे आपले दिलेले पैसे मागण्या साठी अमळनेरत आला असता त्याला मारहाण करून त्याच्याकडील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम देखील हिसकाऊन घेतली या संदर्भात अधिक माहिती अशी कीं महेंद्र सुदाम महाजन याने तीन महिने पूर्वी चोपड्यातील सुनिल मनोहर सोनगिरे यांच्याकडून दीड लाख रुपये उसनवारीत घेतले होते. त्यातील 30 हजार रुपये घेण्यासाठी 8 डिसेंबर रोजी सुनिल याला बोलवून घेतले. महेंद्र महाजन आणि त्याचा मित्र दीपक मराठे यांनी, “सर्वात आधी तुम्ही आम्हाला पैसे द्या, आम्ही तुला त्याचं जेवण करून नंतर पैसे देऊ,” असे सांगत धुळे रस्त्यावर नायरा पेट्रोल पंपाजवळ रोकड देण्यासाठी आले. सुनिल जेव्हा तिथे पोहोचला, तेव्हा महेंद्र आणि दीपक यांनी त्याला मारहाण करून १५ ग्रॅम वजनाची ४० हजार रुपयांची सोन्याची आंगठी आणि खिशातील ५ हजार ३०० रुपये काढून घेतले. त्यानंतर दोघेही मोटरसायकलवर तेथून पळून गेले.
मारहाणीत सुनिल याच्या हातात आणि डोक्यात गंभीर दुखापत झाली, त्यामुळे तो तेथेच पडून राहिला. धुळ्यातील लोकेश शालीग्राम सूर्यवंशी याने तिथे पुढे जाऊन सुनिलला पाणी पाजले आणि त्याला दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले.
या घटनेवरून महेंद्र सुदाम महाजन आणि दीपक मराठे यांच्यावर भारतीय न्याय संहिता 119 (1), 3(5) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक रविंद्र पिंगळे करीत आहेत.