परभणी येथील संविधानाच्या अवमान प्रकरणात दोषींवर कठोर कारवाईची मागणी अमळनेर प्रांताना दिले निवेदन
अमळनेर : विक्की जाधव
दि. १०/१२/२०२४ रोजी परभणी येथे भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीचा केलेला अपमान या घटनेच्या निषेधार्थ अमळनेर येथील नागरिकांनी एकत्रितपणे आवाज उठवला. घटनास्थळी उपस्थित नागरिकांच्या भावना दुखावल्या गेल्या असून, या गंभीर प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.दोषींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांचे भारतीय नागरिकत्व रद्द करण्याची मागणी केली जात आहे. याचप्रमाणे, पोलिसांकडून राबवले जाणारे कोबिंग ऑपरेशन तात्काळ थांबवावे, अशी देखील मागणी करण्यात आली.
संविधानाचा अवमान भारतीय नागरिकांच्या अस्मितेवर एक मोठा आघात असल्याने समाजातील प्रत्येक घटकाने या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे.
निवेदन सादर करत असताना उपस्थित नागरिकांमध्ये विशाल सोनवणे, गौतम बि-हाडे, बाळासाहेब संदानशिव, अर्जुन संदानशिव, राहुल बि-हाडे, मनोज शिंगाने, गौरव सोनवणे, नवीन शेख यांच्यासह इतर अनेक समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. विविध समाजातील नागरिक आणि युवकांनी एकत्रितपणे प्रांतधिकाऱ्यांना निवेदन सादर करून तात्काळ कठोर कारवाईची मागणी केली.
यासोबतच, प्रशासनाने निष्पक्षपणे कार्य करून नागरिकांच्या भावना जपण्याचे आवाहन करण्यात आले. परभणी प्रकरणाच्या निषेधाने सामाजिक ऐक्याचे दर्शन घडले असून, नागरिकांनी एकत्र येऊन संविधानाच्या मूल्योंचे रक्षण करण्याची गरज अधोरेखित केली आहे.