लोकमान्य करंडक – २०२४ राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत प्रताप महाविद्यालयाचे यश
अमळनेर : विक्की जाधव
प्रताप महाविद्यालयातील इ.१२ वी वर्गातील विद्यार्थी चि. अखिलेश मनोज पाटील व चि. चंदन भिका चौधरी यांनी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक जयंती निमित्ताने पुणे येथे आयोजित लोकमान्य करंडक – २०२४ राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत सहभाग घेवून सांघिक प्रथम पारितोषिक पटकावले. त्यांना सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्रताने सन्मानित करण्यात आले. याबाबत खानदेश शिक्षण मंडळाचे चिटणीस तथा प्रताप महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए. बी.जैन सर , प्राध्यापक प्रतिनिधी तथा उपप्राचार्य प्रा.पराग पाटील सर, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. उल्हास जी. मोरे सर, प्रा.वसंत पाटील सर, प्रा. किरण पाटील सर यांनी सदर विद्यार्थ्याचे अभिनंदन व सत्कार केला.