बारामती येथील काँग्रेस चे पदाधिकारी रोहित बनकर यांनी दिलेला राजीनामा पक्षश्रेष्ठिंकडून नामंजूर…
.
बारामती ( सह-संपादक – संदिप आढाव)
.
कॉग्रेस पक्षाचे ओबिसी सेलचे नेते रोहित बनकर यांनी आपल्या पदाचा दिलेला राजीनामा पक्षाने फेटाळला आहे.यामुळे बनकर सारख्या निष्ठावंत कार्यकर्तेवर पुन्हा एकदा विश्वास टाकला असुन पक्षाचे नुकसान टाळले आहे.
नुकत्याच महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या त्यात काँग्रेस् पक्षाचा दारून पराभव झाला आहे. सदर निवडणुकीत पक्षातील अंतर्गत गटबाजी मुळे पक्षाला पराभवाला सामोरे जावे लागले. या गोष्टीला कंटाळून बारामती येथील ओबीसी नेते रोहित बनकर यांनी काँग्रेस पार्टी च्या ओबीसी सेल चा प्रदेश उपाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता.
राजीनाम्याची पक्षाच्या वरिष्ठ पधाधिकारी यांनी दखल घेतली. प्रांताध्यक्ष नाना पटोले व ओबीसी प्रांताध्यक्ष भानुदास माळी यांच्या सूचनेने रोहित बनकर यांचा राजीनामा नामंजूर केला असल्याची माहिती प्रदेश सरचिटणीस धनराज राठोड & प्रदेश प्रसिद्धीप्रमुख शैलेश राऊत यांनी दिली. तसेच पक्ष वाढीसाठी पूर्ववत आपले काम करत राहणेबाबत रोहित बनकर यांकडे अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
दुपटीने काम करणार ..
मी पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ते असुन मी जोमाने काम करणार असून पक्षाचे वैभव पुन्हा प्राप्त करणार असल्याचे रोहित बनकर यांनी सांगितले.