December 18, 2024 1:54 am

एसटी बसचा भीषण अपघात एक ठार तर 21 प्रवासी जखमी

अपनी भाषा में पढ़े! Translate

डिसेंबर महिना जाणू आपघाताचा राज्यात जणू काही बस अपघाताचे सत्रच सुरु आहे.

 

 

अमळनेर : विक्की जाधव 

पहाटे चोपडा रोडवर पिंपळे फाट्याजवळ एसटी बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात एक जण ठार झाल्याची माहिती समोर येत आहेत. तर 21 प्रवासी जखमी झाले आहेत. या अपघातात बस ड्रायव्हर गंभीर जखमी असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे.

धरणगाव तालुक्यातील दोनगाव येथे बस अनियंत्रित होऊन इलेक्ट्रिक पोलला धडकल्यानंतर 28 प्रवासी जखमी झाल्याची घटना शुक्रवारी घडली होती.

तर धरणगाव आणि चोपडा रोडवरील पिंपळे गावाजवळील फाट्याजवळ शनिवारी १४ डिसेंबर रोजी सकाळी सहा वाजेच्या सुमारास रस्त्यावर उभे असलेल्या एका ट्रॅक्टर क्रमांक (एमएच १९ ईजी ३९५२) ला धरणगाव चोपडा मार्गे जाणारी जळगाव शिरपूर बस क्रमांक (एमएच १४ बीटी ३९१०) ने मागून जोरदार धडक दिल्याची घटना घडली.या भीषण अपघातात बसचा पुढचा भाग पूर्णपणे चक्काचूर झाला असून एक जण जागीच ठार तर बसमधली २१ प्रवासी गंभीररित्या जखमी झाले आहेत. यातील बसचालकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी यांनी दिली आहे.

 

 

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!