December 18, 2024 12:18 pm

परभणी येथील संविधानाच्या प्रतिकृतीची तोडफोड केल्याच्या घटनेचे पडसाद दौंड येथे.

अपनी भाषा में पढ़े! Translate

परभणी येथील संविधानाच्या प्रतिकृतीची तोडफोड केल्याच्या घटनेचे पडसाद दौंड येथे.
आंबेडकरी जनतेच्या वतीने संविधान स्तंभ येथे घटनेचा जाहीर निषेध करण्यात आला.
प्रतिनिधी – विकी ओहोळ
8446119158
दौंड – महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय समाजातील प्रत्येक व्यक्तीची अस्मिता आहे. या संदर्भात जर कोणी अपप्रवृत्ती जनक, वादग्रस्त विधान किंवा दगडफेक अशा पद्धतीचे कृत्य करत असतील तर हि बाब निषेधार्थ आहे ज्या महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधान लिहिले आहे, त्या संविधानाच्या प्रतिकृतीला दि १०/१२/२०२४ रोजी परभणी येथील संविधानाच्या प्रतिकृतीस तोडफोड करून महामानव डॉ. बाबासाहेब आबेडकर यांच्या पुतळ्यावर दगडफेक करण्यात आली आहे हि तोड़फोड जाणीव पूर्वक जातीय द्वेष भावनेतून करण्यात आली आहे या घटनेचा दौंड शहर व तालुक्यातील समस्त आंबेडकरी जनतेच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला व संबंधित आरोपी तसेच या घटनेचा मुख्य सूत्रधार याचा शोध घेऊन संबंधितावर देश द्रोहाचे गुन्हे दाखल करून कड़क शासन करण्यात यावे तसेच महाराष्ट्र सरकार ने पोलीस प्रशासनाने कोम्बिंग ऑपरेशन च्या नावाखाली समाजातील महिला व युवकांना मारहाण करून खोटे गुन्हे दाखल केले आहेत ते तात्काळ थांबविण्यात यावे यासाठी दौंड शहरातून जनआक्रोश मोर्चा मध्ये सर्व संविधान प्रेमी व जाती धर्माचे बांधव मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!