January 5, 2025 10:47 pm

अमळनेर ची स्नेहल माळी ला राष्ट्रीय रोड सायकलिग अजिक्य पद स्पर्धेत कास्य पदक

अपनी भाषा में पढ़े! Translate

अमळनेर ची स्नेहल माळी ला राष्ट्रीय रोड सायकलिग अजिक्य पद स्पर्धेत कास्य पदक

 

अमळनेर : विक्की जाधव 

ओरिसा राज्यातील पुरी येथे 7 ते 10 डिसेंबर रोजी झालेल्या 29 व्या राष्ट्रीय रोड सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेत कु. स्नेहल शत्रुघ्न माळी हिने कास्य पदक पटकविले आहे. या स्पर्धेतीत सहभागी स्पर्धक हे सर्व राज्य विजेते,भारतीय रेल्वे, संरक्षण सेवा, आशियाई खेळ, स्पोर्ट्स अथॉरिटी इंडिया, खेलो इंडिया खेलो आणि या सर्वांमध्ये अमळनेरची स्नेहल माळीने कास्यपदक पटकावले. राष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेत तिचे चौथे पदक असुन कुरुक्षेत्र येथे सुवर्णपदक, पनवेल येथे कांस्यपदक आणि रांची येथे सिल्व्हर पदक मिळाले आहे.

स्नेहल ला सायकलिंग फेडरेशन चे उपाध्यक्ष प्रताप जाधव,महाराष्ट्र सायकलिंग असोसिएशन चे संजय साठे, जिजामाता पुरस्कार विजेती दिपाली निकम , शिवछत्रपती पुरस्कार विजेती दिपाली शिळदणकर आणि ती सध्या सराव करत असलेले महाराष्ट्र टिम प्रशिक्षक दर्शन बारगुजे फिनिक्स सायकलिंग ॲकेडमी पुणे यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. स्नेहल शत्रुघ्न माळी हि पुणे निगडी येथे कार्यरत असलेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी यांची कन्या आहे.अमळनेर येथील सामाजिक कार्यकर्ते पंकज मराठे व त्याच्या पत्नी जयश्री मराठे सायकलिंग स्पर्धा बघण्यासाठी पुरी येथे उपस्थित होते.

तिच्या यशाबद्दल विजय मोरे, योगेश येवले, श्याम संदानशिव, रवींद्र पाटील, जितेंद्र जैन, निलेश पाटील, विजय पाटील,मुन्ना जैन, कैलास याद्निक, दिनेश पालवे,जय योगेश्वर महाविद्यालयाचे चेअरमन डि. डि. पाटील सर्व प्राध्यापक, सर्व संचालक यांनी आभिनंदन केले आहे. स्नेहल जय योगेश्वर महाविद्यालयाची विद्यार्थी असल्याने तिचा सत्कार करणार आहेत.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!