महिला पोलिसा च्या जाचाला कंटाळून अमळनेर पोलिस ठाण्यात तक्रार करण्यासाठी ताडेपुरा येथील महिला एकवटल्या
तक्रार घेण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक याना दिले निवेदन..
10 डिसेंबर रोजी दुपारी क्रिकेट चा चेंडू ताडेपुरा येथील महिला पोलीस हिमानी पारधी हिच्या अंगणात जाऊन पडला,,तो घेण्यासाठी एक तरुण आला असतांना,,, त्याला सदर महिला पोलीस हिमांगी ने हटकले व शिवीगाळ केली नंतर याचे भांडणात रूपांतर झाले,,परिसरातील सगळे लोकं याचे प्रत्येक्ष दर्शी असतांना,,,पोलीस ठाण्यात हिमांगी ने पदाचा कायद्याचा गैरवापर करत,समबंधीत तरुणाने माझा विनयभंग केल्याची तक्रार देऊन,,खोटा गुन्हा ही दाखल केला.आहे
गुन्हा दाखल होत असतांना, परिसरातील सर्वच महिला हिमांगी ची समजूत काढत होते. याचा राग हिमानी ने मनात ठेवला.
घरी येऊन रात्री 10 च्या सुमारास,,समजूत काढणाऱ्या,महिलांनाच अश्लील ,जातीवाचक शिवीगाळ हिमानीने केली,
रात्री परिसरात तणावाचे वातावरण तयार झाले,
म्हणून सकाळी ताडेपुरा येथील सर्व महिला एकवटून त्या महिला पोलीस विरुद्ध तक्रार देण्यासाठी दुपारी 12 वाजेपासून ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत ठिय्या मांडून होत्या
परंतु पोलीस निरीक्षक ,मिटींग निमित्त जळगाव येथे असल्याचे कारण सांगत,,गुन्हा दाखल साठी आपण नंतर यावे असे नागरिकांना सांगून फक्त निवेदन घेतले आहे.महिला पोलास हिमानी ची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही.तिचा प्रतिबंध न केल्यास तिची तक्रार जळगाव येथे पोलीस अधीक्षक यांच्या कडे केली जाईल असे महिलांनी ठाम भूमिका घेतली आहे.