कपिल मनोरे यांना पीएचडी पदवी प्रदान..
अमळनेर : विक्की जाधव.
खानदेश मंडळ संचलित प्रताप महाविद्यालयातील वाणिज्य व व्यवस्थापनशास्त्र या विद्याशाखेचे सहाय्यक प्राध्यापक कपिल राजेंद्र मनोरे यांनी क.ब.चौ. उ.म.वि,जळगाव या विद्यापीठात आपले संशोधन थिसेस सादर केले.त्यांचा पीएचडी वायवा हा दिनांक 11 डिसेंबर 2024 रोजी ऑनलाइन संपन्न झाला.
त्यांचा विषय ए स्टडी ऑफ पेशंट्स सॅटिस्फॅक्शन अँड सर्विस कॉलिटी ऑफ प्रायमरी हेल्थ केअर सेंटर इन जळगाव डिस्ट्रिक्ट हा होता. त्यांना डॉ.विना पी भोसले (सहयोगी प्राध्यापिका, कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट,जळगाव) यांनी मार्गदर्शन केले. यावेळी प्रताप महाविद्यालयाचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थिती होते. यां यशाबद्दल संशोधक कपिल मनोरे यांचे सर्वत्र स्वागत व अभिनंदन होत आहे.