January 8, 2025 3:03 pm

खान्देशच्या सुपुत्राला गुजरातच्या मुख्यमंत्रानी गौरविले

अपनी भाषा में पढ़े! Translate

खान्देशच्या सुपुत्राला गुजरातच्या मुख्यमंत्रानी गौरविले

आपल्या खान्देशातील देऊर शहादा येथील शेतकऱ्याच्या घरी जन्मलेल्या साधारण युवकाने गुजरात येथे असाधारण कामगिरी करून दाखविली.

सुरत येथील साई धारा NX चे प्रेरणादायी संस्थापक श्री रविद्रसिंग भटेसिंग राजपूत (रवि शेठ) यांना गुजरातचे मुख्यमंत्री श्री भूपेंद्रभाई पटेल यांच्या हस्ते “उद्योन्मुख गुजरात पुरस्कार” (इमर्जिंग गुजरात अवॉर्ड) ने सन्मानित करण्यात आले आहे.

गुजरात राज्यात वस्त्रोद्योगातील व्यावसायिकांना त्यांच्या असामान्य योगदानासाठी आणि नाविन्यपूर्ण कार्यासाठी हा पुरस्कार दिला जातो.

यापूर्वी देखील श्री रविंद्रसिंग राजपूत यांना माननीय गृहमंत्री श्री हर्ष संघवी यांच्या हस्ते “ग्रोथ इंजिन ऑफ इंडिया” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

या प्रतिष्ठित सन्मानासाठी साई धारा NX चे कठोर परिश्रम, समर्पण, उत्कृष्टता व श्री रवि राजपूत यांच्या प्रेरणादायी नेतृत्वामुळे शक्य झाले असल्याचे बोलले जाते.

उद्योगपती श्री रविशेठ राजपूत यांचे फक्त उद्योग क्षेत्रात नावलौकिक नसून धार्मिक व सामाजिक क्षेत्रात देखील त्यांचे मोठे योगदान आहे. शिंदखेडा तालुक्यातील तामथरे या गावी साधारण 12 कोटी चे राधाकृष्ण मंदिराचे काम प्रगतीपथावर असून या मंदिराचे ते अध्यक्ष आहेत. गोरगोरबांसाठी त्यांचे हात नेहमी मदतीला धावून येतात.

श्री रविशेठ राजपूत यांच्या कार्याचा गौरवासाठी शिरपूर येथील श्री एकलिंगजी फॉउंडेशन तर्फे त्यांचा सत्कार व अभिनंदन करण्यात आले. यावेळी एकलिंगजी फॉउंडेशन अध्यक्ष श्री किरणसिंग सिसोदिया, उपाध्यक्ष श्री मंगलसिंग राजपूत, सचिव श्री योगेंद्रसिंग सिसोदिया, सदस्य श्री जयसिंग राणा, ज्ञानूसिंग चौधरी, दीपक राजपूत, रविंद्र निकुम, राजेंद्र निकुम उपस्थित होते.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!