रोहित बनकर यांनी राजीनामा दिल्याने काँग्रेस पक्षाला धक्का…
.
बारामती ( सह-संपादक – संदिप आढाव)
विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा दारुण पराभव झाल्यानंतर ओबिसी विभाग प्रदेश उपाध्यक्ष रोहित बनकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.दरम्यान रोहित बनकर सारख्या निष्ठावंत पदाधिकारी यांनी राजीनामा दिल्याने पक्षाला मोठा धक्का बसला आहे.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे पाणीपत झाले असून दारुण पराभव झाला आहे.या पराभवास वरिष्ठ अधिकारी, जिल्हा अध्यक्ष आदी महत्त्वाच्या व्यक्तींनी काम केले नाही.
यावेळी आपल्या पदाचा राजीनामा पक्षाचे अध्यक्ष नाना पटोले व भानुदास माळी प्रदेश अध्यक्ष ओबीसी विभाग काँग्रेस यांच्याकडे लेखी पत्राद्वारे दिला आहे.
दरम्यान निष्ठावंत कार्यकर्ते रोहित बनकर यांनी राजीनामा दिल्याने पक्षाला मोठा धक्का बसला असून त्यांचा राजीनामा स्वीकारला जाणार का? याकडे लक्ष लागले आहे…