June 28, 2025 4:45 pm

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकी नंतर नव्या सरकारमध्ये यंदा मोठी भाऊबंदकी!!

अपनी भाषा में पढ़े! Translate

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकी नंतर नव्या सरकारमध्ये यंदा मोठी भाऊबंदकी!!

प्रतिनिधी : वर्षा चव्हाण

नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत राज्य सरकारच्या नव्या निवडीत विधिमंडळात अनेक जण कौटुंबिक नाती असलेली मंडळी पाहायला मिळतील. यामध्ये भाऊ, जावई सासरे, काका पुतणे, बहिण भाऊ अशी मोठी मांदीयाळी पाहायला मिळणार आहे.
कोकणातून नारायण राणे यांची दोनही मुले आमदार झाले असून कणकवली मतदारसंघातून नितेश राणे भाजपकडून तर निलेश राणे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतून कुडाळ मतदारसंघातून विजयी झाले आहेत दोघे सख्खे भाऊ यावेळी विधानसभेत दिसणार आहेत.

दुसरीकडे नगर जिल्ह्यात जावई सासऱ्यांची जोडी विधानसभेत पोचली आहे. भारतीय जनता पक्षाकडून पाथर्डी मतदारसंघातून शिवाजीराव कर्डिले हे पुन्हा एकदा विधानसभेत पोचले असून, अहिल्यानगर शहर मतदारसंघातून संग्राम जगताप विजयी झाले आहेत. संग्राम जगताप हे कर्डिले यांचे जावई आहेत.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड मतदारसंघात हर्षवर्धन जाधव यांच्या विरोधात रावसाहेब दानवे यांची कन्या व हर्षवर्धन यांची पत्नी संजना जाधव यांनी बाजी मारली. तर त्याच वेळी भोकरदन मतदारसंघातून रावसाहेब दानवे यांचे चिरंजीव संतोष दानवे दुसऱ्यांदा विधानसभेत पोहोचले आहेत हे सगळे बहिण भाऊ आता विधानसभेत दिसतील हे दोघेही भाजपकडूनच आमदार झाले आहेत.

बारामती विधानसभा मतदारसंघातून उपमुख्यमंत्री अजित पवार हे सलग आठव्यांदा विजयी झाले आहेत तर त्यांचे पुतणे रोहित पवार हे कर्जत जामखेड मतदारसंघातून दुसऱ्यांदा विजयी झाले आहेत. त्यांच्या निमित्ताने विधानसभेत यंदाही काका पुतण्यांची जोड दिसणार आहे मात्र दोघेही एकमेकांचे विरोधक असणार आहेत. अजित पवार हे महायुतीकडून तर रोहित पवार हे महाविकास आघाडीतून विजयी झाले आहेत.

वरळीतून शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे दुसऱ्यांदा आमदार झाले आहेत, तर त्यांच्याच शिवसेना उद्धव
बाळासाहेब ठाकरे पक्षातून मावस भाऊ वरुण सरदेसाई हे वांद्रे पूर्व या मतदारसंघातून पहिल्यांदा आमदार झाले आहेत. यानिमित्ताने मावसभावांची जोडी विधानसभेत
पहिल्यांदा पाहायला मिळणार आहे.

लातूर शहरातून विलासराव देशमुख यांचा वारसा चालवणारे अमित देशमुख पुन्हा विजयी झाले आहेत. तर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव करून कराड दक्षिण मधून भाजपच्या तिकिटावर डॉक्टर अतुल भोसले विधानसभेत पोहोचले आहेत. अतुल भोसले आणि अमित देशमुख हे मेहुणे असून त्यांची ही जोडी विधानसभेत दिसणार आहे, मात्र अमित देशमुख हे काँग्रेसचे आमदार असतील, तर भोसले हे भाजपचे… अशाप्रकारे नव्या सरकारमध्ये यंदा मोठी भाऊबंदकी पाहायला मिळत आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!