गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटील यांना महत्वाची खाती तर राष्ट्रवादीचे मंत्री तथा अमळनेरचे आमदार अनिल भाईदास पाटील यांना यावेळी डच्चू मिळण्याची शक्यता..
अमळनेर : विक्की जाधव
अमळनेरकरांची अपेक्षा आम्हालाही मंत्रिपद मिळावे.
परंतु भुसावळचे आमदार संजय सावकारे हे गेल्या चार टर्मपासून विजयी होत आहेत. राष्ट्रवादीत असतांना त्यांना राज्यमंत्रीपद देण्यात आले होते. मात्र भाजपाने त्यांना मंत्रीपद दिले नाही. जळगाव शहरचे आमदार राजूमामा भोळे हे सलग तीन टर्मपासून विजयी होत असून तेही मंत्रिपदासाठी आग्रह धरु शकतात.
नुकतीच महाराष्ट्र विधानसभा निवडणुका पार पडल्या सर्वच पक्षांनी चांगली बॅटिंग करत सत्ता स्थापनेसाठी दावे प्रतिदावे केलेत. तर तर मुख्यमंत्री कोणाचा असेही गुड कायम होते. शेवटी विधानसभा निवडणुकीत महायुतीला जळगाव जिल्ह्यातून मोठे यश आले असून भाजपाचे पाच, शिवसेनेचे पाच व राष्ट्रवादीचा एक आमदार विजयी झाला आहे. जिल्ह्यातील सर्वच अकरा मतदारसंघात महायुतीचा झेंडा फडकला असून आता मंत्रिपदाचे वेध लागले आहे. महायुतीत अद्यापही मुख्यमंत्री ठरला नसला तरी संभाव्य मंत्र्यांची नावे मात्र चर्चेत आली आहेत.
राष्ट्रवादीचे विद्यमान मंत्री तथा अमळनेरचे आमदार अनिल भाईदास पाटील यांना यावेळी डच्चू मिळण्याची शक्यता बळावली आहे.
संकटमोचक अशी ख्याती असलेले गिरीश महाजन व मुलूख मैदान तोफ गुलाबराव पाटील यांना मात्र मंत्रिमंडळात मोठी खाती मिळणार आहेत.
त्यात भाजपकडून देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन, रविंद्र चव्हाण, मंगलप्रभात लोढा, चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार, नितेश राणे, शिवेंद्रसिंहराजे भोसले, राहुल कुल, माधुरी मिसाळ, संजय कुटे, राधाकृष्ण विखे पाटील, गणेश नाईक, पंकजा मुंडे, गोपीचंद पडळकर यांची नावे पुढे येत आहे. भाजपाकडून विजयकुमार गावित व सुधीर मुनगंटीवार यांना डच्चू मिळू शकतो. शिवसेना शिंदे गटाकडून उदय सामंत, शंभूराज देसाई, गुलाबराव पाटील, संजय शिरसाट, भरत गोगावले, प्रकाश सुर्वे, प्रताप सरनाईक, तानाजी सावंत, राजेश क्षीरसागर, आशिष जैस्वाल, निलेश राणे यांचे नावे आघाडीवर असून दीपक केसरकर, अब्दुल सत्तार, संजय राठोड यांना नारळ मिळू शकते. राष्ट्रवादी अजित पवार गटातर्फे धनंजय मुंडे, अदिती तटकरे, हसन मुश्रीफ, धर्मराव बाबा अत्राम, अजित पवार, छगन भुजबळ यांचा समावेश असून अमळनेरचे आमदार अनिल पाटील यांना या मंत्रिमंडळात स्थान मिळू शकणार नाही अशी स्थिती आहे.
महायुतीचे मंत्रिपदाची खिरापत वाटली तर त्याचा संदेश चुकीचा जावू शकतो. शिवाय एकाच जिल्ह्यात मंत्र्यांची संख्या अधिक राहिली तर त्याचा परिणाम स्थानिक राजकारणावर होत असतो.
आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महायुतीला निर्णय घ्यावे लागणार आहेत.