November 21, 2024 11:58 am

गद्दारनाथाने केसाने गळा कापला भाजपाच्या हातचे बाहुले बनला

अपनी भाषा में पढ़े! Translate

गद्दारनाथाने केसाने गळा कापला
भाजपाच्या हातचे बाहुले बनला
भाग-३
शिवसेना पक्ष प्रमुख व मुख्यमंत्री असलेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचा मोह झाला नाही.या गद्दारीने ते इतके दुखावले गेले की, बहुमत सिद्ध करण्याच्या भानगडीत न पडता ते मुख्यमंत्री पदावरून पायउतार झाले. त्यांचा वर्षा बंगला ते मातोश्री पर्यंतचा प्रवास कोट्यावधी महाराष्ट्रीयन जनतेचे ह्रदय विदीर्ण करून गेला. हा अपमान निष्ठावंत शिवसैनिक व महाराष्ट्राची स्वाभिमानी जनता कधीच विसरू शकत नाही. भारतीय जनता पक्षाने आपले बहुमत नसताना पक्षांची फोडाफोडी व आमदारांची ठोक खरेदी करून राजकाराचा चिखल करून टाकला आहे. लोकशाही व जनादेश पायदळी तुडवून राजकारणात हीन पातळी गाठली आहे.
एकनाथ शिंदे हा स्वत:ला दिघेसाहेबांचा पट्टशिष्य म्हणवून घेत होता. परंतू तो पक्षनिष्ठेचा गुरूमंत्रच विसरला. नव्हे पायदळी तुडवला. आपल्या गद्दारीपुर्वी लोकांची सहानूभूती मिळवण्यासाठी व आपले ब्रांडिंग करण्यासाठी याच एकनाथ
शिंदे यांनी काही भाडोत्री कलाकारांना वेठीस धरून धर्मवीर मु.पो.ठाणे हा चरित्रपट बनवला. हा चित्रपट धर्मवीर दिघे साहेबांच्या नावाने असला तरी त्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांनी अनेक खोटे प्रसंग घुसडून स्वत:ची लाल करून घेतली. या चित्रपटाच्या स्वरूपावरूनच गद्दारीची पुसटशी कल्पना आली होती.
आपल्या मातृपक्षाने,ज्याने या रिक्षावाल्या/ टेम्पो चालकाला राजकिय जन्म दिला, त्यानेच आपल्या मातृतूल्य पक्षाच्या उदरावर सपासप वार केले. शिंदेंनी मतभेदामुळे पक्ष त्याग केला असता तर नवल वाटले नसते. यापुर्वीही बंडू शिंगरे, छगन भुजबळ, नारायण राणे, गणेश नाईक, सतिश प्रधान व अखेर राज ठाकरे यांनीही पक्ष त्याग केला. राज ठाकरे व नारायण राणे यांनी अनुक्रमे मनसे व स्वाभिमानी पार्टी काढून स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यात राज ठाकरे व मनसे काही अंशी टिकून आहेत मात्र राणे पिता पुत्रांनी आपला स्वाभिमान गहाण ठेवत कधी कॉन्ग्रेस तर कधी भाजप अशी भटकंती केली. आत्ता बाप भाजपातून निवडणूक लढवत आहे तर पुत्र मिंधे गटातर्फे निवडणूक लढवित आहे. तिच गत गणेश नाईक व संजीव नाईक यांची झाली आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सतिश प्रधान हे देखील असे शिवसेना राष्ट्रवादी व मनसेचे ढक्के खात पुन्हा शिवसेनेत आले. या लोकांनी पक्ष सोडला पण पक्ष फोडला नाही, आमदार खासदार फोडले नाहीत, अगदी राज ठाकरे यांनी देखील पक्ष व चिन्हावर दावा केला नाही.परंतू या गद्दारनाथ शिंदे यांनी तर ज्या घराने त्याला आश्रय दिला,पालन पोषण केले, शाखा प्रमुख, नगरसेवक, सभागृह नेता, ४ वेळा आमदारकी,विरोधी पक्ष नेता, पालकमंत्री व कॅबिनेट मंत्रीपद असे भरभरून दान त्याच्या पदरात टाकले, जे अन्य कोणाच्या नशीबी आले नाही,ते सर्व दिले. इतकेच नव्हे तर पोरसवदा नवख्या पोराला दोन दोन वेळा खासदार केले, तरी या बकासूराची भूक मिटली नाही.त्याने भाजपाच्या इशा-यावर गद्दारी करून मातेसमान पक्ष फोडला. आपल्याकडे आकृष्ट करून घेण्यासाठी खोट्या वा जून्या केसेसची भीती दाखवून, घरदारं उद्धस्त करण्याची धमकी देत व भाजपा व समृद्धी महामार्गात कमावलेला हरामाच्या पैश्यांचे आमिष दाखवून असंख्य पदाधिकारी व माजी नगरसेवक फोडले. बाकी इतिहास ताजाच आहे.
या गद्दारनाथाने प्रथम भाजपाच्या मदतीने राज्यपालांना (कोश्यारी) मॅनेज केले, नंतर विधानसभा अध्यक्ष व पक्षांतरात तरबेज असलेल्या नार्वेकरांना मॅनेज केले.
पुढे जाऊन केंद्रिय निवडणूक आयोगाला मॅनेज करून पक्ष व चिन्हही पळवले. सर्वोच्य न्यायालयाने सर्वस्तरावर अवैध व असंवैधानिक ठरवलेले सरकार सर्वोच्च न्यायालयास मॅनेज करून तारिख पे तारिख मिळवून आपल्या असंवैधानिक सरकारचा कालावधी पूर्ण केला. गुन्हेगारांसाठी वेळी अवेळी ही कोर्ट सुरू ठेवणा-या न्यायालयाने राष्ट्रीय पातळीवरील हा महत्वाचा निवाडा देण्यात कालापव्यय करून सर्वोच्च न्यायालयाची विश्वासार्हता धुळीस मिळवली. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायमूर्ती चंद्रचूड यांना देशाच्या इतिहासात ऐतिहासिक व लोकशाहीच्या दृष्टीने दिशादर्शक निर्णय देण्याची संधी होती. परंतू त्यांच्या घरी पंतप्रधान मोदी हे गणपतीच्या आरतीस आले त्याच दिवशी भारतवासीयांना कळून चुकले की, दालमे कालाही है. देशाच्या इतिहासात एखाद्या पंतप्रधानाने सरन्यायाधिशाच्या घरी जाण्याची ही पहिलीच घटना ( दुर्घटना ) ठरली.
गद्दारनाथ एकनाथ शिंदे व त्यांच्या ४० आमदारांना घरचा रस्ता दाखवण्याची सुवर्ण संधी २० तारखेला लाभत आहे. या दिवशी या गद्दारांना गाडून आपण महाविकास आघाडीला विजयी केल्यास पुन्हा अशी गद्दारी व पक्ष फोडेगिरी करण्याची हिंमत कोणातही होणार नाही.
दिलीप मालवणकर
ज्येष्ठ पत्रकार
९८२२९०२४७०
दिलीप मालवणकर
ज्येष्ठ पत्रकार
९८२२९०२४७०

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!