महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल करणारा पक्ष : भारतीय जनता पक्ष !
( निष्पक्ष पत्रकारिता: भाग-२ )
महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल करणारे कोण ? हा प्रश्न विचारण्याची निकड नसावी. इतके सुस्पष्ट उत्तर जे सर्वश्रूत आहे.भारतीय जनता पक्ष हा पुर्वीप्रमाणे तत्व व नीतीमत्तावादी राहीलेला नाही.लालकष्ण अडवाणी, अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळातील भाजप राहिलेले नाही. भामटे जमवलेला पक्ष अशी त्याची ओळख सर्वदूर पसरलेली आहे.
स्वत:चे १०५ + आमदार असताना एक प्रबळ विरोधी पक्ष म्हणून प्रभावीपणे काम करून सत्ताधा-यांना फैलावर घेण्याची संधी होती. परंतू मोदी व शहा या जोडगोळीचा महाराष्ट्र व प्रामुख्याने मुंबईवर वक्रदृष्टी असल्याने जे मोरारजी देसाईंना जमले नाही ते मोदी शहा यांनी करून दाखवले. महाराष्ट्रात एक नतद्रष्ट व खोटारडा नेता भाजपने पोसलेला होता. वेगळा विदर्भ होत नाही तोपर्यंत मी लग्नच करणार नाही ? अशी कोल्हेकुई करणा-या लबाड लांडग्याने महाराष्ट्र
द्रोहाचा कंड शवण्यासाठी वेगळा विदर्भ होऊ शकत नाही हे पासून आपला तुंबलेली विवाहाची मनीशा पूर्ण करून विदर्भवासीयांशी गद्दारी केली.
आपल्या मुख्यमंत्री पदात ज्या शिवसेनेचे मोठे योगदान होते, त्याचा विसर पडून पुन्हा मुख्यमंत्री पद मिळवण्यासाठी मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन ! अशी गदर्भासारखी आरोळी ठोकली.त्यांचे आलाकमान अमित शहा यांनी सत्ता आल्यास मुख्यमंत्रीपद अडिच वर्षे शिवसेना भाजपात वाटून घेण्याचे मातोश्रीवर ठरले असताना त्याचा इन्कार करून स्वत:कडेच मुख्यमंत्रीपद ठेवण्याचा प्रयत्न केला. पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पहिली अडिच वर्षे भाजपला देण्याचे मोठ्या मनाने मान्य करूनही भाजपाने आडमुठेपणा सोडला नाही. त्यामुळे शिवसेनेने राष्ट्रवादी व कॉंग्रेसची मोट बांधुन सत्ता स्थापन केली. उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री असावेत ! असा आग्रह आघाडीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी धरल्याने उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पद स्विकारले. जेमतेम सहा महिनेच होत नाही इतक्यात अचानक जगाला हादरवून टाकणारी कोरोनारूपी महामारी आली. यामुळे संपुर्ण जगाचे व्यवहार ठप्प झाले.जगण्यासाठी जीवंत राहणे महत्वाचे होते.त्यासाठी रूग्णांवर उपचार व औषधोपचार होणे आवश्यक होते. देशातील अन्य राज्यात मृत्यूने थैमान घातले असताना महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कुटुंब प्रमुखाप्रमाणे महाराष्ट्राची काळजी घेतली. त्यावेळी सर्वच व्यवहार ऑनलाईन पद्धतीने सुरू होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कुटुंबप्रमुखाच्या नात्याने वारंवार लाईव्ह संदेश देत भयभीत जनतेला दिलासा दिला. त्याचप्रमाणे रूग्णांचे प्राण वाचविण्यासाठी कसोशिने प्रयत्नांची पराकाष्टा केली.त्यामुळेच महाराष्ट्रातील मृत्यू दर देशातीलअन्य राज्यांपेक्षा खुप कमी होता.
याच दरम्यान शिवसेनेने पाळलेला अस्तनीतील साप डूख धरून बसला होता. २०१४ सालीच कै.अनंत तरे यांनी या सापाचा डाव ओळखून जाहिर केेले होते, या एकनाथ शिंदेला आवरा, नाही तर तो दुसरा नारायण राणे होईल. तरे यांचे भाकित तंतोतंत खरे ठरले. एकनाथ शिंदे हे भाजपाशी पुर्वीपासून संधान साधून होते.भाजपानेही फासे टाकलेच होते. दोघेही योग्य संधीची वाट पाहत होते. भाजपने दोन वर्षात शिंदे सह इतर आमदारांच्या फाईली तयार केल्या. गद्दारनाथ एकनाथ शिंदे आपली राजकिय महत्वाकांक्षा पूर्ण होण्याची संधी शोधत होताच. आणि पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे हे जीवघेण्या स्पाईन सर्जरीने जर्जर झालेले असल्याची आयतीच संधी पाहून त्यांनी स्वत:सह ४० आमदार व १२ खासदार फोडले व आपल्या मातृपक्षाच्या उदरात खंजीर खुपसला. शिवसेना पक्ष हाच ज्या भाजपाच्या महाराष्ट्रावरील वर्चस्वाआड येणारा पक्ष होता त्यावर घरभेद्या गद्दारनाथाला हाताशी धरून घाव घातला. पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख अशी ख्याती असताना व कोरोना काळात त्यांनी केेलेल्या कार्याची दखल जागतिक आरोग्य संघटनेने ( W.H.O.) घेतलेली असताना हाच गद्दारनाथ पक्षप्रमुखाच्या आजारपणाचा गैरफायदा घेत भाजपाच्या सहकार्याने शिवसेना रूपी वटवृक्षावर घाव घालण्यात यशस्वी झाला.
शिवसेना पक्ष प्रमुख व मुख्यमंत्री असलेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचा मोह झाला नाही.या गद्दारीने ते इतके दुखावले गेले की, बहुमत सिद्ध करण्याच्या भानगडीत न पडता ते मुख्यमंत्री पदावरून पायउतार झाले. त्यांचा वर्षा बंगला ते मातोश्री पर्यंतचा प्रवास कोट्यावधी महाराष्ट्रीयन जनतेचे ह्रदय विदीर्ण करून गेला. हा अपमान निष्ठावंत शिवसैनिक व महाराष्ट्राची स्वाभिमानी जनता कधीच विसरू शकत नाही.
दिलीप मालवणकर
ज्येष्ठ पत्रकार
९८२२९०२४७०
पुढील भाग- वाचा.पुढील अंकात