पंकज ठाकरे यांची आदर्श निवडणूक प्रचार पद्धती परिवर्तनाच्या वाटचालीकडे..
पंकज ठाकरे हा एका खाजगी कंपनीत काम करणारा सामान्य कामगार पोरगा श्रीमंत व प्रस्थापित लोकांच्या विरोधात शेतकरी, शेतमजूर, कामगार व गोरगरीब जनतेची कर्तृत्ववान पोरं आमदार व्हावी हे उद्दिष्ट घेऊन हिंगणा विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवीत आहे. पंकज ठाकरे यांनी गाडगेबाबा व तुकडोजी महाराज यांची विचारसरणी समोर ठेवून बोलते नव्हे तर कर्ते व्हा या तत्वावर चालणारी कर्मयोगी फाऊंडेशन नावाची संस्था स्थापन केली. अल्पावाधितच या संस्थेने ४५ उपक्रम राबवित तब्बल २१७ गावात कार्यविस्तार केला. आपल्या कार्याचा दाखला देत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून तिकीट मिळविण्यासाठी शर्थीचे प्रयन्त केले, तेव्हा त्यांच्या लक्षात आले की ज्यांच्याकडे पन्नास शंभर कोटी रुपयांची मालमत्ता आहे त्यांनाच राजकीय पक्षाची तिकीट मिळते.
पुढील पन्नास वर्षात सुद्धा गरिबांच्या मुलांना तिकीट मिळणार नाही अशी विदारक परिस्थिती आहे. त्यामुळे पंकज ठाकरे यांनी यात बदलावं आणण्यासाठी कुठेही हिंमत न हारता अपक्ष निवडणूक लढवीण्याचे ठरविले. यातही ते कमी पैशात सुद्धा निवडणूक लढविता येते हे कृतीतून दाखवून देत आहेत. पंकज ठाकरे व त्यांची कर्मयोगी फाऊंडेशनची २४ लोकांची चमू व त्यांची काही मित्र मंडळी सकाळी ७ वाजता स्वतःचे जेवणाचे डबे घेऊन त्यांच्या मित्रानी प्रचारासाठी दिलेल्या निशुल्क दोन चारचाकी गाड्या व काही दोनचाकी गाड्या घेऊन निघतात व आतापर्यंत १६३ गावात प्रत्येक घरोघरी जाऊन माहितीपत्रक देत आपले कार्य सांगत आता गोरगरीब जनतेचे ध्येयवादी पोरं राजकारणात यावे हे परिवर्तन घडविण्यासाठी हिंगणा मतदार संघांचे नव्हे तर विदर्भाचे कल्याण व्हावे हे आमचे उद्दिष्ट आहे हे पोटतीडकीने समजून सांगत आहेत. दुपारच्या प्रहरी एखाद शेत पाहून प्रत्येकजण आपली शिदोरी उघडून जेव्हण केल की लगेच रात्री ९ वाजेपर्यंत प्रचार कार्य सुरु ठेवत आहे. पंकज ठाकरे यांची ही आदर्श प्रचार पद्धती व हिंगणा मतदार संघात असणारे दोन लाख कामगार मतदाते पंकज ठाकरे या आपल्या कमगार भावाकडे वळले तर हिंगणा मतदार संघात परिवर्तनसुद्धा होऊ शकते ही चर्चा आता ऐकायला मिळत आहे. सोबतच पंकज ठाकरे यांची आपल्या प्रामाणिक कार्यामुळे असणारी लोकप्रियता, कुणबीबहुल मतदार संघ, बौद्ध व मुसलमान. समाज यांच पंकज ठाकरे यांच्यावर असलेलं प्रचंड प्रेम या सर्व गोष्टींचा तालमेल साधला तर चमत्कारसुद्धा घडू शकतो हे आता मोठ्या प्रमाणात बोलल्या जात आहे..