June 29, 2025 4:51 am

२५०० कोटींचा निधी आणला, मग डोळ्याला दिसेल असे काम दाखव गावाचा रस्ता पाच वर्षात दोनदा तरीही खस्ता.. मा. आ. शिरीष चौधरी 

अपनी भाषा में पढ़े! Translate

२५०० कोटींचा निधी आणला, मग डोळ्याला दिसेल असे काम दाखव गावाचा रस्ता पाच वर्षात दोनदा तरीही खस्ता.. मा. आ. शिरीष चौधरी 

 

अमळनेर : विक्की जाधव 

‘बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल’ या म्हणीचा खरा अर्थ अमळनेर विधानसभा मतदारसंघातील आक्रमक मतदारांनी उदाहरणासह सांगितला आहे. २५०० कोटींचा निधी आणला मग डोळ्याला दिसेल असे काम दाखव असा जाब अनिल पाटील यांना गावोगावी आणि जागोजागी विचारला जात आहे.

अमळनेर शहरात शुद्ध आणि रुचकर खावय्या ग्राहकांसाठी फॅमिली ची उत्तम व्यवस्था फक्त कोमल भोजनालयात. 

आपल्या पाच वर्षाच्या कार्यकाळात अमळगाव ते हिंगोणे या रस्त्याचे काम दोन वेळा केले तरीही हालत खस्ता असल्याचे सांगत चांगलेच तोंडावर पाडले जात आहे.

पावसाळ्यात अमळगाव, दोधवद आणि हिंगोणे येथील ग्रामस्थांची या रस्त्यामुळे शेतकऱ्यांची सहेलपट झाली. आणि पाच वर्षांच्या कार्यकाळात या रस्त्याचे दोन वेळा काम करण्यात आले तरी मंत्री महोदयांच्या गावाला जाणारी वाट िबकटच आहे. इतक्या कोटींचा निधी आणला आणि तितक्या कोटींचा निधी आणला या वल्गना वांझोट्या आहेत. पाच वर्षाच्या कार्यकाळात ज्या काही मोजक्या पाणंद रस्त्यांची कामे झाली ती अतिशय निकृष्ठ आणि तकलादू असून अमळगाव हिंगोणे रस्ता केवळ झाकी आहे मतदारसंघात फिराल तर चित्र खूपच वाईट आहे.

 

 

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!