संविधान बचाव कृती समितीच्या वतीने आज बारामती मध्ये व्याख्यानाचे आयोजन
बारामती : ‘संविधान बचाव कृती समिती’च्या वतीने आज (दि. १४) बारामती येथे ‘निर्भय बनो भारत जोडो’ अभियानंतर्गत डॉ. विश्वंभर चौधरी आणि ऍड. असीम सरोदे यांच्या व्याखानाचे आयोजन करण्यात आले आहे.
भिगवण चौक, बारामती येथे नगर परिषदेच्या समोर आज गुरुवार (दि. १४) रोजी संध्याकाळी पाच वाजता हे व्याख्यान होणार आहे. ‘संविधानिक नैतिकता व लोकशाही’ असा त्यांच्या व्याख्यानाचा विषय असून अन्यायाविरुद्ध सुरू असलेल्या या न्यायाच्या लढाईत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन समितीचे भारत रामचंद्र आणि अनिकेत मोहिते यांनी केले आहे.