संविधान बचावासाठी डॉ शिंदे यांना विजयी करा – मनोज पाटील घड्याळ ला मत म्हणजे गद्दाराला मत
अमळनेर :विक्की जाधव
आपली लढाई संविधान बचावासाठी आहे, देशात आज दलित,अल्पसंख्याक समाज दहशती खाली वावरत आहे,आपण गांधी-नेहरू यांच्या विचारांचा पाईक असल्याने,,संविधानाच्या बचावासाठी महाविकास आघाडीचे अमळनेर विधानसभेचे अधिकृत उमेदवार म्हणून डॉ अनिल शिंदे यांना प्रचंड मताधिक्याने निवडून द्या असे आवाहन काँग्रेस चे शहराध्यक्ष मनोज पाटील यांनी केले आहे,
अमळनेर शहरात शुद्ध आणि रुचकर खावय्या ग्राहकांसाठी फॅमिली ची उत्तम व्यवस्था फक्त कोमल भोजनालयात.
डॉ शिंदे यांच्यावर काँग्रेसी विचारधारेचा प्रभाव आहे,त्यांनी पक्षाशी आपल्या विचारांशी कधी ही गद्दारी केली नाही,विद्यमान मंत्री अनिल पाटील यांनी पक्षाशी गद्दारी केली,खासदार शरद पवार साहेब,खासदार सुप्रिया ताई सुळे यांच्यावर अपमानजनक टीका केली हे अमळनेर ची जनता विसरली नाही ,पवार साहेबांच्या नावावर निवडून गेलेल्या या गद्दाराला अमळनेर ची जनता या निवडणुकीत धडा शिकवेल यात शंका नाही,एकीकडे घडयाळ ला मत म्हणजे भाजपाला मत आहे तर दुसरीकडे माजी आमदार शिरीष चौधरी हे शिंदे सेनेचे डमी उमेदवार आहेत,कार्यसम्राट माजी आमदार ,साडे चार वर्षे अमळनेरमधून गायब असतो,अन निवडणूक आली की,प्रकट होतो,
खोट्या प्रचाराला बळी पडू नका, अमळनेर शहराच्या व तालुक्याच्या शांततेसाठी शांतताप्रिय काँग्रेसचे डॉ शिंदे यांना विजयी करा, असे आवाहन मनोज पाटील यांनी केले