July 1, 2025 1:29 pm

उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे काही तासच शिल्लक असताना शरद पवार यांनी मोठं पाऊल उचलत उमेदवारच बदलला..

अपनी भाषा में पढ़े! Translate

उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे काही तासच शिल्लक असताना शरद पवार यांनी मोठं पाऊल उचलत उमेदवारच बदलला..

 

अमळनेर : विक्की जाधव 

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आजचा शेवटचा आहे. अनेक पक्षांकडून उमेदवारांची दुसरी-तिसरी यादी जाहीर होत आहे.

मात्र उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे काही तासच शिल्लक असताना शरद पवार यांनी मोठं पाऊल उचलत उमेदवारच बदलला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शदर पवार गटाकडून मोहोळ मतदारसंघात माजी आमदार रमेश कदम यांच्या कन्या सिद्धी कदम यांना उमेदवारी जाहीर केली होती. सिद्धी कदम या महाराष्ट्रातील सर्वात कमी वयाच्या उमेदवार ठरल्या होत्या. मात्र त्यांना उमेदवारी दिल्याने स्थानिक पातळीवरील कार्यकर्ते, पदाधिकारी नाराज झाले होते. आता शरद पवार यांनी मोठं पाऊल उचलत सिद्धी कदम यांची उमेदवारी रद्द केली असून सिद्धी यांच्याऐवजी राजू खरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. यासंदर्भात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना पत्रदेखील दिले आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!