अमळनेरत आला आदर्श राजकारणाचा प्रत्यय: राजकीय विरोधक डॉक्टर अनिल शिंदे यांचा मा. आ. शिरीष चौधरी यांचे बंधू रवींद्र बापू चौधरीनी केला यथोचित सत्कार
अमळनेर : विक्की जाधव
राजकीय परिवेशात अनेकदा प्रतिकूलता व कटुत्व दिसून येते, परंतु अमळनेर तालुका याला अपवाद ठरला. नुकतीच राजकीय विरोधकांमध्येही एक आदर्श उदाहरण अमळनेरकरांना पाहायला मिळाले .
हिरा उद्योग समूहाचे चेअरमन डॉक्टर रवींद्र बापू चौधरी यांनी डॉक्टर अनिल शिंदे यांचा यथोचित सत्कार करून राजकीय शिष्टाचाराचे महत्त्व स्पष्ट करून दिले. रवींद्र बापू चौधरी यांचे नेतृत्व हे ‘आदर्श राजकारनाचे प्रतीक बनले आहे.
अमळनेर तालुका एक वैचारिक तालुका असून, येथे राजकीय विरोधकांमध्येही मित्रत्वाचे संबंध दिसून आलेत ही राजकीय नेत्यांची विशेषता आहे. रवींद्र बापू चौधरी यांनी डॉक्टर अनिल शिंदे यांच्या नामांकन रॅलीचे केलेले स्वागत हे डॉक्टर अनिल शिंदे यांनी मोठ्या आदरतिथ्याने स्वीकारले हे या दोघे नेत्यांची विशेष सकारात्मक भावना तालुक्यातील जनता एक आदर्श राजकीय व्यक्ती निर्माण करेल याची अमळनेर तालुका शाश्वती देत आहे. काल झालेल्या या सत्काराने तालुक्यात चर्चेला उधाण आले होते.
“आम्ही द्वेषची भावना ठेवत नाही आणि माणसं जपणारी माणसे आहोत,” असे चौधरी यांनी स्पष्ट केले.
आदर्श राजकारणाच्या माध्यमातून, रवींद्र बापू चौधरी यांची कृती जनतेच्या मनात एक सकारात्मक भावना निर्माण करते. “शिरीष दादा चौधरी जनतेचा आमदार,” असे म्हणत, जनतेने त्यांच्या कार्याची प्रशंसा केली आहे. रवींद्र चौधरी
याच पार्श्वभूमीवर विरोधकांनी प्रचार रॅलीचे फोटो काढून अपप्रचार करण्यात येत आहे. तथापि, अमळनेरच्या जनतेने या गोष्टींचा त्वरित सामना करून, आपल्या आवाजात एकता दाखवली आहे. या घटनेने एका अद्वितीय राजकीय वातावरणाची निर्मिती केली आहे.