डॉ. अनिल शिंदे यांचा जनसागर घेऊन शक्ती प्रदर्शन करत भरला आपला नामांकन अर्ज
अमळनेर : विक्की जाधव
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, अमळनेरमध्ये डॉक्टर अनिल शिंदे यांनी आपल्या विधानसभेच्या काँग्रेस पक्षाकडून उमेदवारीसाठी नामांकन अर्ज भरण्याच्या वेळी एक उत्कृष्ट जनसागर शक्ती प्रदर्शन केले. डॉक्टर अनिल शिंदे हे विरोधक उमेदवारांच्या शर्यतीत एक प्रमुख चेहरा आहेत.
डॉक्टर अनिल शिंदे यांच्या उमेदवारी रॅलीत सर्वात जास्त महिलांची गर्दी पाहायला मिळाली, जिचा महत्त्वपूर्ण संदेश तालुक्यात असा जातो की समाजातील सर्व स्तरांत महिलांनी त्यांचे एकत्रित समर्थन दर्शवले आहे. महिलांची मोठी उपस्थिती रॅलीला अधिक रंगत आणत होती,
“अमळनेरात सुरु आहे एकच फॅक्टर – शिंदे डॉक्टर,” यावर त्यांनी जोरदार प्रकाश टाकला आहे.
डॉक्टर अनिल शिंदे यांचा तालुक्यात मोठा जनसंपर्क आहे, ज्यामुळे त्यांनी अनेक वर्षांपासून समाजातील लोकांना वैद्यकीय सेवा पुरवली आहे लोकांमध्ये त्यांचा जनसंपर्क चांगला आहे. आमदार मंत्री अनिल भाईदास पाटील यांची घरवासी करणे हे देखील त्यांचे ध्येय आहे. त्यांना जनतेचा विश्वास प्राप्त झाला आहे.
डॉक्टर अनिल शिंदे यांच्या नेतृत्वाची ग्रामीण भागात सतत मागणी होत आहे. त्यांचा स्थानिक विकास तसेच तरुणांना रोजगार आणि महिलांच्या सक्षमीकरणावर विशेष लक्ष केंद्रित करणे हे त्यांच्या मुख्य मुद्दयांपैकी एक उद्दिष्ट आहे.