अमळनेर विधानसभा उमेदवारांची वैधता व राजकीय गुत्थी

अपनी भाषा में पढ़े! Translate

अमळनेर विधानसभा उमेदवारांची वैधता व राजकीय गुत्थी

 

अमळनेर : विक्की जाधव

अमळनेर विधानसभा २०२४ च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, उमेदवारांच्या अर्जांची छाननी करण्यात आली असून निवडणूक निर्णय अधिकारी नितीन मुंडावरे यांनी महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. या निर्णयात डॉक्टर अनिल शिंदे, माजी आमदार शिरीष चौधरी, माजी आमदार अनिल भाईदास पाटील आणि इतर काही उमेदवारांचे अर्ज वैध ठरवले.

तर कैलास दयाराम पाटील, जयश्री अनिल पाटील, प्रदीप किरण पाटील आणि संगीता प्रमोद पाटील यांचे अर्ज अवैध ठरवण्यात आले आहेत.

विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात, डॉक्टर अनिल शिंदे, माजी आमदार शिरीष चौधरी, अनिल भाईदास पाटील यांच्यासह अमोल रमेश पाटील, अशोक लोटन पवार, सचिन अशोक बाविस्कर, छबिलाल लालचंद भिल, निंबा धुडकू पाटील आणि कोको कोला सर यांच्या सौभाग्यवती प्रतिभा रवींद्र पाटील, प्रथमेश शिरीष चौधरी, यशवंत उदयसिंग मालचे व शिवाजी दौलत पाटील यांच्याही अर्जांची वैधता छाननी करण्यात आली आहे. या प्रक्रियेने अमळनेर विधानसभेत राजकीय गूढता आणि मतदारांच्या मनातील संभ्रम वाढवला आहे.

अधिकार्‍यांनी वैध ठरलेल्या अर्जांमधून पुढें किती उमेदवार माघारी घेतात याकडे तालुक्यातील जनतेचे लक्ष लागून आहे. 

विशेषतः अनिल भाईदास पाटील यांचा नावाचा मुद्दा येतो, जे समांतर नावाने दोन उमेदवार आहेत. १) माजी आमदार अनिल भाईदास पाटील तर दुसरे २) अनिल भाईदास पाटील रणाईचे ह्या दोघात मतांचे विभाजन होण्यास शंका निर्माण होते. आणि माजी आमदार अनिल भाईदास पाटील त्यांच्या विजयावर प्रश्न चिन्ह उभे राहत आहे. 

या गोष्टीचा फायदा डॉक्टर अनिल शिंदे किंवा माजी आमदार शिरीष चौधरी यांना होऊ शकतो यात शंका नाही.

राजकीय व्यक्ती एकमेकांवर खोटी आरोप करीत असताना, शास्वत विकासाच्या नावाने, अमळनेर तालुक्यातील अवस्था अस्वस्थ झाली आहे. त्यामुळे मतदार मतदानाच्या प्रक्रियेमध्ये अधिक सावध झाले आहेत. निवडणुकीपूर्वीच्या या उलथापालथीमुळे आगामी दृष्य स्पष्टपणे माहीत असले तरी पुढे काय होईल हे जाणून घेण्यासाठी स्थानिक लोकांची उत्सुकता वाढली आहे.

अमळनेर विधानसभा २०२४ च्या निवडणूक प्रक्रियेत उमेदवारांच्या वैधतेचा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे. उपलब्ध माहिती आणि साक्षात्कारांवरून, आगामी निवडणुकांमध्ये कोणतेही अनपेक्षित वळण येऊ शकते. राजकीय गुत्थीत व्यक्तिमत्त्वांचे विभाजन आणि मतदारांची संभ्रम यामुळे सुत्रधार आणि स्थानिक नेत्यांना चांगलीच चक्रव्यूहता समोर येत आहे. पुढील काही दिवसांत या सर्व घटनाक्रमांचा कसा परिणाम होईल, हे लक्षात घेणे महत्त्वाचे ठरेल.

 

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!