मार्मिक ने प्रसिद्ध केलेला ग्राउंड झिरो रिपोर्ट

अपनी भाषा में पढ़े! Translate

मार्मिक ने प्रसिद्ध केलेल्या ग्राउंड झिरो रिपोर्ट नक्कीच वाचा

मार्मिक न्यूज नेटवर्क :

माजी आमदार अनिल पाटील यांच्या कार्यशैलीवर असंतोष आणि विकासकामांची वास्तविकता या मुद्द्यांवर माहितीपत्रक प्रस्तुत करण्याच्या उद्देशाने मार्मिक आज अमळनेर तालुक्यातून एक विशेष लेख सादर करीत आहे. नुकतीच मंत्री अनिल पाटील यांच्या कार्यशैलीवर नाराज असलेल्या तालुक्यतील जनसामान्य शेतकरी विविध संघटनेचे पदाधिकारी आणि भाजपाचे काही पदाधिकारी सक्रियपणे काम करण्यास मागे हटले आहेत. याच संदर्भात अजित पवार यांनी अमळनेर तालुक्यात २५०० कोटींच्या विकासकामे अमळनेर तालुक्यात झाली परंतु याच विकासाची हकीकत काय आहे?

अजित पवार यांच्या दौऱ्यानंतर विकसित कामांच्या सुरुवातीकडे बोट दाखविणाऱ्यांनी त्यांच्या वक्तव्याला गंभीरतेने घेतले आहे. पवार यांनी केलेल्या वक्तव्यावर ह्या विकास कामांचे उद्दीष्ट म्हणजे तालुक्यातील लोकसंख्येसाठी विविध सुधारणा साधणे आहे. तथापि, आधारभूत तथ्ये आणि ग्राउंडवरच्या परिस्थिती मुळे, ह्या विकासा वर अधिक प्रश्न निर्माण होतात. अमळनेर तालुक्यात फक्त भाषण आणि बॅनर यांचाच विकास झाला आहे असे तालुक्यातील जनसामान्यातून बोलले जात आहे.

टाळलेले आणि अर्धवट राहिलेले काम म्हणजे पडळसरे धरणाचे अपूर्ण काम, जे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी तालुक्यातील कष्टकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. याशिवाय, तालुक्यातील अनेक असंख्य शेतकऱ्यांचे पिक विमा एकाच वेळी रद्द करण्याच्या घटनेने त्यांचे आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे. माजी आमदार मंत्री अनिल भाईदास पाटील यांच्याकडे मदत आणि पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन खाते असताना देखील. तालुक्यातील शेतकरी इतका अहवालदिल राहिला कसा असाही प्रश्न निर्माण होत आहे. 

शेजारील चाळीसगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर होऊन बरेच महिने लटले तरी अमळनेर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर का नाही झाला म्हणून प्रश्न निर्माण होत आहेत.

 

संविधानामध्ये उपलब्ध असलेल्या विकास निधीचा वापर करुन होणाऱ्या कामांची गुणवत्ता देखील संशयात आहे. स्थानिक शासन सर्वसामान्य विकासाच्या नावाखाली खूप कमी प्रमाणात कामे करत असून, नवीन रोजगार निर्मितीच्या संकेतांचा अभाव निर्माण होत आहे. यामुळे तालुक्यातील शेतकरी व विद्यार्थी रोजगाराच्या बाबतीत अडचणीत सापडले आहेत. एकंदरीत मागील पाच वर्षात तालुक्याचा विकास हा झालाच नाही. असे विरोधकांकडून बोलले जात आहे.

अनेक छुप्यायुती व विरोधी भूमिकांमुळे राजकीय असमर्थन देखील बाहेर येताना दिसत आहे. माजी मंत्री अनिल भाईदास पाटील यांच्याच विरोधात रणाईच्या गावातून त्यांच्याच नावाचा उमेदवार विधानसभा निवडणूक लढवायच्या तयारीत असून त्यांनी नामांकन देखील दाखल केले आहे. त्यामुळे, माजी आमदारांच्या निवडणुकीतील यशाबद्दल शंका उपस्थित होऊ लागली आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!