महाविकास आघाडीत बंडखोरी ! अशोक पवार व के डी बापू पाटील यांनी भरले आपले नामांकन पत्र
अमळनेर : विक्की जाधव
महाविकास आघाडीच्या दोन उमेदवारांनी बंडखोरी करत आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.उमेदवारी मागण्यासाठी राष्ट्रवादी आणि काँग्रेस मधील इच्छुकांची मागील बऱ्याच दिवसापासून जणू भाऊ गर्दीचं लागली होती. पक्षाने सर्वांना डावलत डॉक्टर अनिल शिंदे यांना उमेदवारी जाहीर केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रा अशोक पवार यांनी अपक्ष उमेदवारीचे नामांकन केले असून बंडखोरी केल्याने अमळनेर तालुक्यात एकच चर्चा सुरू आहे. एवढेच नव्हे तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे के डी पाटील यांनी एक अर्ज अपक्ष आणि एक काँग्रेस पक्षातर्फे उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. दोघेही नेत्यांचा पक्षाला थोडाफार तरी फरक पडेल अशी आशा व्यक्त होत असताना येणाऱ्या दिवसात त्यांचे फॉर्म माघारी होतात का याकडे सर्वंचे लक्ष लागून आहे.
के डी पाटील यांच्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्षा सुलोचना वाघ ,तालुकाध्यक्ष बी के सूर्यवंशी , डी डी पाटील , माजी तालुकाध्यक्ष गोकुळ बोरसे , मनोज पाटील , तुषार संदानशिव यांच्यासह काही कार्यकर्ते हजर होते.