November 21, 2024 2:37 pm

जानवे येथील शेतकऱ्याचा पंचायत समिती आवारात आत्मदहनाचा प्रयत्न शेतकऱ्यांचे काम वेळेत होत नसल्याचा केला आरोप

अपनी भाषा में पढ़े! Translate

जानवे येथील शेतकऱ्याचा पंचायत समिती आवारात आत्मदहनाचा प्रयत्न शेतकऱ्यांचे काम वेळेत होत नसल्याचा केला आरोप

अमळनेर : विक्की जाधव

जानवे येथील शरद नथु पाटील व सुभाष भिला पाटील यांनी शेतात मोहगणी वृक्षलागवड करण्यासाठी 7 मे ला ऑनलायीन प्रस्ताव सादर केला होता. तसेच १९ जुलै ला ऑफलाईन प्रस्ताव पंचायत समितीला दिला होता. ४५ दिवसात मंजुरी मिळणे आवश्यक असताना १३० दिवस उलटूनही मंजुरी मिळत नव्हती.वारंवार टाळाटाळ केली जात होती.

जिल्हापरिषदचे रोजगार हमीचे गटविकास अधिकारी धांडे यांनी दोन दिवसात मंजुरी देतो असे आश्वासन दिल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले.

अखेरीस १९सप्टेंबर रोजी शरद पाटील यांनी निवेदन देऊन गटविकास अधिकारी किशोर शिंदे व सामूहिक कार्यक्रम अधिकारी किशोर ठाकरे यांच्यावर कारवाईसाठी २५ सप्टेंबर रोजी आत्मदहनाचा इशारा दिला होता. मात्र मंजुरी देण्याऐवजी त्यांनी मोका पाहणी केली असता पूर्वतयारी केली नाही असा शेरा मारून आपण शेतात रब्बी हंगामात कापूस लागवड केली असे असे विचित्र उत्तर दिले. अद्याप खरीप हंगाम सुरू असताना गटविकास अधिकाऱ्यांनी असं विचित्र उत्तर दिल्यावर शरद पाटील अधिकच संतप्त झाले होते. त्यांनी २५ रोजी बाटलीत पेट्रोल आणून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलीस सागर साळुंखे , कैलास शिंदे , शेतकरी नेते प्रा सुभाष पाटील , डॉ अनिल शिंदे यांनी शरद पाटील यांना आवरून समजूत घालण्याचा प्रयत्न केला. यावेळी प्रा सुभाष पाटील व डॉ अनिल शिंदे अधिकाऱ्यांना जाब विचारायला गेले असता एकाने अश्लील शिवीगाळ केल्याने आंदोलक अधिकच संतप्त झाले. त्यावेळी इतर अधिकाऱ्यांनी आवराआवर केली.

 

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!