करमाळा प्रतिनिधी :- शिवसेनेचा मुख्य कणा हा शिवसैनिक व शाखा प्रमुख असून त्यांच्या पाठबळावरच आजपर्यंत शिवसेनेची यशस्वी वाटचाल चालू आहे. त्यामुळे शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख प्रा.शिवाजी सावंत यांच्या मार्गर्शनाखाली करमाळा तालुक्यातील शिवसेनेचे शाखा प्रमुख, शिवसैनिक व पदाधिकारी यांचा समन्वय साधण्यासाठी तसेच पक्षवाढीच्या अनुषंगाने महत्वपूर्ण चर्चा करण्यासाठी सदर मेळाव्याचे आयोजन किल्ला वेस येथील खोलेश्वर मंदीरा समोरील सभागृहामध्ये आज करण्यात आलेले होते अशी माहिती शिवसेना युवा नेते कुणाल पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. यावेळी शिवसेना युवासेना व महिला पदाधिकारी यांनी एकमुखाने कुणाल पाटील यांना वरिष्ठांनी करमाळा विधानसभेची उमेदवारी द्यावी अशी आग्रही मागणी केली आहे.
याबाबत अधिक माहिती देताना पाटील म्हणाले की, सदरचा मेळावा हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे लोकाभिमुख कार्य जनतेपर्यंत पोहचविण्याबाबत शिवसैनिकांनी कोठेही कमी पडू नये. तसेच एका विचाराने सर्वांनी पक्षवाढीसाठी काम करण्याकरिता व शाखा प्रमुख, शिवसैनिक व पदाधिकारी यांचा समन्वय साधण्यासाठी सदरच्या मेळाव्याचे आयोजन केले होते. त्यासाठी शेकडो शिवसैनिक उपस्थित राहिले होते. करमाळा तालुका हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. त्यामुळे करमाळा विधानसभेची जागा महायुतीमध्ये शिवसेनेलाच मिळावी याकरिता आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहोत. तसेच लवकरात लवकर करमाळा तालुक्यातील संपर्ण गांवामध्ये शाखा उद्घाटनाचा कार्यक्रम घेणार असून पक्ष मजबूतीकरणासाठी सर्वांनी कामाला लागावे ज्या ज्या ठिकाणी अडचण येईल त्या त्या ठिकाणी आम्ही सर्व पदाधिकारी आपले सोबत असू त्यामुळे शेवटच्या घटकापर्यंत पोहचून पक्षाच्या योजना राबवाव्यात असे आवाहनही यावेळी पाटील यांनी उपस्थित शिवसैनिकांना केले. तसेच हातगाडा व्यवसायिक असो, अथवा किरकोळ काम करून आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह करणारा व्यक्ती असो या सर्वांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभा असून कोणीही आपल्याला त्रास देणार नाही याची दक्षता घेतली जाईल असे अश्वासनही यावेळी पाटील यांनी दिले.
यावेळी युवा सेना जिल्हा समन्वयक निखील चांदगुडे, शिवसेनेच्या महिला तालुका प्रमुख प्रियांका गायकवाड, उप तालुका प्रमुख लक्ष्मी पोळ, उप तालुका प्रमुख दादासाहेब थोरात, युवा सेना शहर प्रमुख विशाल गायकवाड यांनी आपली मनोगते व्यक्त केली. तसेच यावेळी युवा सेना उपजिल्हा प्रमुख श्रीकांत गोसावी, युवा सेना उप तालुका प्रमुख दादासाहेब तनपुरे, विशाल पाटील, मनोज रोकडे, युवा सेना उपतालुका प्रमुख विनोद शिंदे, उपशहर प्रमुख अनिकेत यादव, गणेश पवार, सहकार सेनेचे तालुका प्रमुख सुरज गोसावी, उपतालुका प्रमुख ज्योतीराम काळे, सहसचिव श्रीकृष्ण शिंदे, तुषार झाकणे, गणेश रायकर, शुभम गोसावी, सुमित पवार, अनमोल लोंढे, दत्ता ठोंबरे, नंदू पाटील, विशाल शिंदे, अशोक पाटील, निलेश कांबळे, मेहरकर कोकाटे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे लोकाभिमुख कार्य जनतेपर्यंत पोहचवून व जिल्हा संपर्क प्रमुख प्रा.शिवाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली करमाळा विधानसभेवर भगवा फडकविण्यासाठी आम्ही सर्व नवीन पिढी तयार असून जेष्ठांनी मार्गदर्शनाची भूमिका ठेवत सहकार्य करावे.
– निखील चांदगुडे
युवा सेना जिल्हा समन्वयक, सोलापूर.
चौकट :-
मी सन 1986 पासून शिवसेनेत काम करीत असून आजपर्यंत शिवसेनेला सक्षम उमेदवार मिळालेला नाही. आम्ही पक्षवाढीसाठी वेळप्रसंगी लाठया काठया खाल्या असून मागील काही कालावधीत पक्षात आलेले लोक स्वत:ला पक्षाचे मालक समजत आहेत त्यांना भिक न घालता कुणाल पाटील यांनाच उमेदवारी द्यावी.
– दादासाहेब थोरात, उपतालुका प्रमुख करमाळा
चौकट –
आजपर्यंत करमाळा तालुक्यात शिवसेनेचे काही पदाधिकारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून विकास कामांच्या नावाखाली निधी आणून स्वत:चे खिसे भरण्याचे काम करीत आहेत. जनतेच्या विकासासाठी दिलेल्या निधीचे योग्य पध्दतीने विनियोग होतो आहे का ? ठेकेदाराने केलले काम निकृष्ट दर्जाचे झाले तरी चालेल पण आमची टक्केवारी आम्हाला घरपोच झाली पाहिजे हा हेतू उराशी बाळगून पक्षाचे काम करीत आहेत. मग त्यामध्ये पक्षाच्या नेत्याचे, पक्षाच्या नावाचे त्यांना काही देणेघेणे त्यांना नाही अशा बाजारबुणग्यांना आमदारकीची स्वप्ने पडत आहेत हे हास्यास्पद असून अशा पदाधिकाऱ्यांना पक्षाने उमेदवारी देवू नये तसेच पक्षाच्या नेतृत्वाने याबाबतीत गांभीर्याने पाहत सर्वसामान्य शिवसैनिकांना न्याय देत कुणाल पाटील यांनाच उमेदवारी द्यावी.
– विशाल गायकवाड
युवा सेना शहर प्रमुख करमाळा