November 21, 2024 4:51 pm

 ही संतांची आणि महापुरुषांची भूमी असून अमळनेर शहर हे शांत असले पाहिजे अशी आमच्या अपेक्षा आहे. डी वाय एस पी सुनील नंदवाडकर.

अपनी भाषा में पढ़े! Translate

ही संतांची आणि महापुरुषांची भूमी असून अमळनेर शहर हे शांत असले पाहिजे अशी आमच्या अपेक्षा आहे. डी वाय एस पी सुनील नंदवाडकर.

 

अमळनेर : विकी जाधव 

ही संतांची आणि महापुरुषांची भूमी असून अमळनेर शहर हे शांत असले पाहिजे अशी आमच्या अपेक्षा आहे नुकतीच अमळनेर पोलीस स्टेशन कडून घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत डीवायएसपी सुनील नंदवाडकर साहेब बोलत होते. यावेळी ते बोलताना म्हटले की

अमळनेर शहरात कितीही तणावाची परिस्थिती असली तरी पोलीस प्रशासन सज्ज आहे. अमळनेरात शहरात जो प्रकार घडला आहे त्या संधर्भात तपास सुरु आहे. कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही. तरी कोणावरही अन्याय होणार नाही हें ही आपली जवाबदारी आहे.

गणेशोत्सवात यावेळी पत्रकरांनी शांतीदूत म्हणून अमूल्य कार्य केले आहे. आणि शांततेत गणेश मिरवणुकांना निघण्याचे आव्हान केले. यासंदर्भात अमळनेर शहरातील पत्रकारांचे मानावे तेवढे आभार कमीच! 

स्वतः जळगाव जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब यांनी आणि उपजिल्हा पोलीस अधीक्षक यांनी अमळनेर शहर आणि तालुका पत्रकार संघाचे भरभरून कौतुक केले. अशी माहिती डीवायएसपी नंदवाडकर यांनी दिली.

तरुणांवर गुन्हा दाखल होऊ नये हीच माफक अपेक्षा..

२०१३ साली असाच ऐक गुन्हा दाखल झाला होता. काही दिवसात ती व्यक्ती पोलीस होणार आहे. आज त्याला व्यक्तीला किती त्रास होतोय त्याच त्यालाच माहिती.

मी वयक्तिक सर्वत्र चौका चौका त फिरत आहे गावांत सद्या शांतात आहे तरी अजून आपनास १५ दिवस बारीक लक्ष ठेऊन राहावायचे आहे. शहरातील अशांतता निर्माण करणाऱ्यांवर पोलीस प्रशासन कसून कारवाई करणार आहे.

थोडक्यात: अमळनेर ही संतांची भूमी असून अमळनेर शहरात शांतता आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी आपणावर असून अमळनेर शहर हे आपल्याला सांभाळायचे आहे अशी भावना प्रत्येकाने मनात ठेवावी असे पत्रकार परिषदेत डी वाय एस पी यांनी मनोगत व्यक्त केले. 

 

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!