शहरात अशांतता निर्माण करून अक्षेपार्य घोषणाबाजी. अन् जुलूस मध्ये गावठी कट्टा मिरवणाऱ्या वर गुन्हा दाखल
अमळनेर : विकी जाधव.
19 रोजी ईद असल्याने शहरात जुलूस मिरवणूक काढण्यात आला असता काही लोक अक्षपार्य घोषणा देत शांतता बिघडण्याचा प्रयत्न करत होते.
यासंदर्भात अमळनेर पोलीस स्टेशनला तीनशे ते चारशे लोकांचा जमाव पोलीस स्टेशनमध्ये जमला होता.
देशाच्या विरोधात घोषणाबाजी समस्त देशवासीय सहन करणार नाहीत. देशाविरोधात घोषणा देणाऱ्यांना कडक शासन व्हावे. जमाव अशी मागणी धरून होता. एवढी कारवाई त दिरंगाई होत असल्याकारणाने जळगाव जिल्ह्याच्या खासदार स्मिता उदय वाघ यांनी प्रशासनाला धारेवर धरले होते.
तर झामी चौक परिसरात जुलुस मधील एकाने तोंडाला रुमाल बांधून दोन वेळा फायरिंग केली. तर पाकिस्तान जिंदाबाद अशा आक्षेपार्य घोषणा देत भारताचे सार्वभौमत्व धोक्यात आणण्याच्या उद्देशाने घोषणाबाजी करत जुलूस मध्ये इतर धर्माच्या भावनां दुखतील असे वक्तव्य केले.
हिंदू धर्मियांचे धार्मिक स्थळ असलेले दगडी दरवाजा येथील मांगीर बाबा देवस्थानावर चढून अक्षेपार्य घोषणाबाजी आणि हिरवाझेंडा फडकवला त्यामुळे हिंदू समाजाने आक्षेप घेत या संदर्भात अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून,
शाहरुख छोटा मेवाती, (रा. कसाली डीपी) शोहेब आबीद मिस्तरी , फयजाज आरिफ, दानिश शेख मुख्तार, (रा. शालन नगर) कुभा भाई (रा. चुनाघानी परिसर ) सलमान रफा व कालु भाजीवाल्याचा मुलगा (रा. जिंनगर गल्ली) आणि इतरांवर भारतीय न्याय संहिता: २००३ चे अधिनियम १८९ (१). (२). १९१(२) १९१ (२). महाराष्ट्र पोलीस अधिनियम: १९५१ चे. ३७ (१). (३). १३५ आणि शस्त्र अधिनियम: १९५९ चें. ३. २५ . ७. २७. नुसार अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास अमळनेर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाट करीत आहे.
या. दरम्यान डी वाय एस पी सुनील नंदवाडकर व पोलीस निरीक्षक विकास देवरे. यांनी या प्रकरणात पोलीस सखोल चौकशी करणार असून दोषिनां लवकरात लवकर अटक केली जाईल असे सांगितले.