November 21, 2024 2:57 pm

गट प्रवर्तकांच्या मानधन वाढीचा आदेश निर्गमित एप्रिल २०२४ पासून लागू होणार वाढ

अपनी भाषा में पढ़े! Translate

आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक संघटना
गट प्रवर्तकांच्या मानधन वाढीचा आदेश निर्गमित
एप्रिल २०२४ पासून लागू होणार वाढ
राज्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सुमारे तीन हजार आठशे गट प्रवर्तक गेली अनेक वर्षे काम करीत आहेत.गटप्रवर्तक यांच्या मानधनात भरीव वाढ करून त्यांना कंत्राटी कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात यावा यासह प्रलंबित मागण्यांबाबत संघटनेच्या वतीने विविध प्रकारची आंदोलने सुरू आहेत.
आशा स्वयंसेविका यांच्या मानधनात पाच हजार रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला होता परंतु गटप्रवर्तकांच्या मानधनात तुटपुंजी एक हजार रुपयांच्या मानधन वाढ करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. त्यामुळे त्यांच्यात प्रचंड नाराजी पसरली होती.
म्हणून संघटनेने सातत्याने मंत्रालय पातळींवर प्रयत्न करू ठेवले होते परिणामी शासनाने दि.२० सप्टेंबर २०२४ रोजी सार्वजनिक आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव श्री.मिलिंद म्हैसकर यांच्या सहीने मानधन वाढीचा आदेश काढून त्यांच्या मानधनात पाच हजार रुपयांची वाढ केली आहे. त्यासाठी सुमारे १७.५९ कोटीची तरतुद केली असून सदर मानधन वाढ दि.१ एप्रिल २०२४ पासून लागू केली असल्याचे आदेशात नमूद केले आहे. सदर वाढीबरोबर गट प्रवर्तकांना आता एक वाजता नऊशे रूपये दरमहा मानधन मिळणार आहे.
सदर मानधनवाढीचा फायदा राज्यभरातील राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत काम करणाऱ्या सुमारे तीन हजार आठशे गटप्रवर्तकांना होणार आहे.अखेर संघटनेने केलेल्या पाठपुराव्याला यश आले असल्याचे संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष रामकृष्ण बी. पाटील यांनी म्हटले आहे.
गटप्रवर्तकांच्या मानधन वाढीचा आदेश जरी शासनाने काढला असला तरी त्यांच्या अन्य प्रलंबित मागण्यांसाठी संघटनेच्या वतीने यापुढेही सातत्याने आंदोलने सुरू राहतील अशी माहिती रामकृष्ण पाटील यांनी दिली आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!