November 21, 2024 3:39 pm

“एक क्षण आनंदाचा”पोलीस बांधवांच्या मनाचा ताणाचा व जनाचा विचार करून रोटरी क्लब भिगवण च्या वतीने उपक्रम

अपनी भाषा में पढ़े! Translate

“एक क्षण आनंदाचा”पोलीस बांधवांच्या मनाचा ताणाचा व जनाचा विचार करून रोटरी क्लब भिगवण च्या वतीने उपक्रम

(निलेश गायकवाड)

तंदुरुस्त बंदोबस्त गेले दहा दिवस भिगवन पोलीस स्टेशन अंतर्गत येणारे सर्व अधिकारी पदाधिकारी यांच्या वरती बंदोबस्ताचा ताण होता हा ताण कमी करण्यासाठी “एक क्षण आनंदाचा”पोलीस बांधवांच्या मनाचा ताणाचा आणि जनाचा विचार करून रोटरी क्लब भिगवण नवीन ऊर्जा घेऊन जात आहे.

पोलीस बांधवांना पौष्टिक आहार देऊन दिवसभरासाठी विसर्जन मिरवणूक संरक्षणासाठी नवीन ऊर्जा निर्माण व्हावी म्हणून रोटरी क्लब ऑफ भिगवन चे सर्व सदस्य पदाधिकारी पोलीस स्टेशन मध्ये जाऊन पौष्टिक आहार वाटप करण्यात आले.

यावेळ रोटरी क्लबचे अध्यक्ष संतोष सवाने यांनी बोलताना सांगितले की पोलीस प्रशासनावरती आलेला तान कमी करावा म्हणून आनंदचा एक क्षण पोलीस प्रशासनावरती यावा म्हणून हा उपक्रम राबवण्यात आलेला आहे. माजी अध्यक्ष रणजित भोंगळे यांनी सांगितले की पार्किंग आवरनेस भिगवन बाजारपेठेमध्ये करण्यात यावा वाहनांचे सम विषम तारखेनुसार पार्किंगची व्यवस्था करावी ही मागणी पोलीस प्रशासनासमोर मांडली डॉक्टर चौरे सर यांनी याप्रसंगी बोलताना सांगितले की रोटरी क्लब हे नेहमी असे चांगले उपक्रम राबवत असते गेले दहा वर्षे हा उपक्रम राबवत आहेत या कार्यक्रम प्रसंगी रोटरी रोटरी क्लबचे पदाधिकारी निखिल बोगवत कुलदीप ननवरे रियाज भाई शेख,संपत बंडगर,संजय चौधरी, संजय खाडे किरण रायसोनी दिनेश कोणूर डॉ.अमोल खानावरे हे उपस्थित होते पत्रकार सुंदर कुसाळकर यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला तसेच पोलीस प्रशासनाच्या वतीने विनोद महांगडे यांनी बोलताना सांगितले की आपण पोलीस स्टेशनमध्ये येऊन आज उपक्रम राबवला आहे त्यामुळे आम्हाला खूप एनर्जी आलेली आहे असेच उपक्रम आपण या पुढील काळामध्ये रोटरी बरोबर आपण राबाऊ या वेळी पी एस आय कदम साहेब पी एसआय पाटील, पी एसआय जर्दे,प्रदीप नलवडे, तसेच सर्व महिला पोलीस अधिकारी व पदाधिकारी यांना गुलाब पुष्प देऊन व पौष्टिक आहार देऊन सन्मानित करण्यात आले.
सूत्रसंचालन सचिन बोगावत यांनी केले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!