कर्जत जामखेड चे आमदार रोहित पवार यांची प्रवीण माने यांनी घेतली सदिच्छा भेट
(निलेश गायकवाड)
आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे राजकारण रंगले आहे. जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम आणि आरोग्य सभापती प्रवीण माने यांनी पक्षप्रवेशानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांची सृजन हाऊस हडपसर येथे सदिच्छा भेट घेतली.त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये एकच जल्लोष आहे.
प्रवीण माने यांचे इंदापूर तालुक्यातील राजकारणात व समाजकारणात ते अग्रेसर आहेत. पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम आणि आरोग्य सभापती पद मिळाल्यानंतर त्यांनी तालुक्यात भरीव निधी देऊन अनेक विकासात्मक कामे केली आहेत.येणाऱ्या काळात शरद पवार गटाकडून आपल्याला जर संधी मिळाली तर त्याचा आपण नक्कीच सोनं करू असे प्रवीण माने यांनी बोलताना देखील सांगितलं. प्रवीण माने यांनी इंदापूर तालुक्यातील तळागाळातील कार्यकर्त्यांबरोबर तसेच सर्वसामान्य बरोबर कौटुंबिक व सलोख्याचे नाळ जोडले गेली आहे.
इंदापूर तालुक्यातील प्रवीण माने विधानसभेच्या निवडणुकीसाठी प्रखर दावेदार असल्याची चर्चा बोलली जात आहे.रोहित पवार यांच्याशी विविध विषयांवर चर्चा झाली.