June 29, 2025 8:44 am

अखिल भारतीय क्षत्रिय महासंमेलन मुंबई येथे पारोळ्याच्या सौ शुभांगी राजपूत सन्मानित.

अपनी भाषा में पढ़े! Translate

अखिल भारतीय क्षत्रिय महासंमेलन मुंबई येथे पारोळ्याच्या सौ शुभांगी राजपूत सन्मानित.
– खासदार नारायण राणे, मुख्यमंत्री उत्तराखंड यांच्या उपस्थित संमेलनात प्रतीकात्मक तलवार देऊन केला युवा छत्रानीचा गौरव.
प्रतिनिधी -मयूर पाटील

दिनांक 1 सप्टेंबर रोजी उत्तर भारतीय विद्यालय, बांद्रा येथे अखिल भारतीय क्षत्रिय महासंमेलन मोठ्या थाटात पार पडले. या कार्यक्रमास खासदार नारायण राणे, उत्तराखंड मुख्यमंत्री पुष्करसिग धामी, सुप्रसिद्ध समाजसेवी महाराज भामाशाह मेघराजसिह रावल यांची प्रमुख उपस्थिती होती. अखिल भारतीय क्षत्रिय महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राष्ट्रीय कार्यकारिणी यावेळी उपस्थित होती. देशभरातील राजपूत क्षत्रिय समाजातील उद्योगपती, सरकारी अधिकारी, माजी खासदार आणि समाजसेवक यावेळी आमंत्रित होते.
समस्त देशातील क्षत्रिय राजपूत समाजातील विकासासाठी पुढील उपक्रमाबाबत चर्चा या संमेलनात करण्यात आली. देशभरात मोठ्या संख्येने असलेल्या क्षत्रिय राजपूत समाजाला येणाऱ्या काळात राजकीय प्रतिनिधित्व मिळावं त्याचबरोबर तरुणांना रोजगार आणि उद्योगशीलता वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचे या संमेलनात बोललं गेलं.
प्रदेश कार्यकारिणी सदस्य म्हणून राजेंद्र सिंग ठाकूर – प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र ,उत्तर महाराष्ट्रातून चंद्रशेखर राजपूत, संग्राम सिंग सूर्यवंशी यासोबतच सौ शुभांगीताई निलेश राजपूत या संमेलनाचे प्रतिनिधित्व करीत होत्या. या महासंमेलनात पारोळा येथील सौ शुभांगीताई निलेश राजपूत यांच्या सामाजिक कामगिरी बघता राष्ट्रीय कार्यकारिणी तर्फे गौरविण्यात आले. उपक्रमशील असलेल्या शुभांगीताई सामाजिक सेवेत अग्रेसर असून समाजातील तरुण वर्ग, शैक्षणिक जागरूकता, महिला सक्षमीकरण, पर्यावरण, आदिवासी क्षेत्र सेवाकार्य अश्या अनेक काही दखल यावेळी घेण्यात आली.
या सन्मानामुळे खान्देशासह समस्त महाराष्ट्रातून अभिनंदन तसेच शुभेच्छा मिळत असून, सोबत असलेल्या सर्व जेष्ठ मार्गदर्शक आणि समाजबांधव यांच्या खंबीर साथ आणि सहकार्याने हे शक्य असल्याचे कल्याण-होळ च्या सुपुत्री तसेच सावखेडा-होळ च्या सुनबाई शुभांगीताई राजपूत यांनी सर्वांचे आभार मानले.
शुभांगीताई राजपूत या सावखेडा होळच्या पोलीस पाटील असून श्री अप्पासाहेब पाटील यांच्या सुनबाई तसेच श्री निलेश पाटील यांच्या सुविद्य पत्नी आहेत

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!