आगामी गणेशोत्सवासाठी अमळनेर शहरात शांतता राहावी. तर गणेशउत्सव मोठ्या उत्सहात साजरा करा.
अमळनेर : विक्की जाधव
आगामी गणेशोत्सवासाठी अमळनेर शहरात शांतता आणि सुव्यवस्था राहावी यां अनुषंगाने अमळनेर पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली शांतता कमिटी चे बैठकीचे आयोजन करण्यात आले होतें. यावेळी बोलतांना उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर यांनी सांगितले की गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व त्रासदायक लोकांना हद्दपार केले जाईल. राजकीय लोकांना मंदिर अथवा धार्मिक कार्यक्रमात सहभागी होता येईल मात्र राजकीय भाषणे करता येणार नाही याची काळजी मंडळांनी देखील घेतली पाहिजे.
डीजे लां असेल परवानगी…
डी जे ला बंदी नाही मात्र ध्वनी प्रदूषणाचा ह्यांस व्हायला नको याची गणेश मंडळानी काळजी घ्यावी.
डीजे च्या होणाऱ्या कर्कश्या आवाजा मुळे आपल्यां परिसरात राहणाऱ्या व्रद्धाना किती त्रास होतोय याची आपण काळजी घेतली पाहिजे डीजे च्यां आपण मर्यादा पाळाव्यात असे आवाहन अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांनी सांगितले.
तर अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघ ,पोलीस स्टेशन ,मुंदडा बिल्डर्स , नगरपालिका , महसूल प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने यावर्षी देखील शिस्तीत आणि वेळेत मिरवणूक काढणाऱ्यांचा सन्मान केला जाईल असे अध्यक्ष चेतन राजपूत यांनी सांगितले.
यावेळी सामाजिक मंडळे, सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाचे कार्यकर्ते पदाधिकारी, राजकीय कार्यकर्ते , महिला मंडळ ,पोलीस पाटील व पत्रकार उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर , डीवायएसपी सुनील नंदवाळकर , महावितरण चे कार्यकारी अभियंता तुषार नेमाडे , मुख्याधिकारी तुषार नेरकर ,पोलीस निरीक्षक विकास देवरे , मारवड पोलीस स्टेशनचे सहा पोलीस निरीक्षक जीभाऊ पाटील हजर होते.