June 29, 2025 12:21 pm

शिरसटवाडी गावात श्रावणी बैलपोळा उत्साहात साजरा….

अपनी भाषा में पढ़े! Translate

शिरसटवाडी गावात श्रावणी बैलपोळा उत्साहात साजरा….

पिंपरी बुद्रुक
दिनांक: ०३/०९/२०२४
प्रतिनिधी – समाधान रजपूत .

शिरसटवाडी :- ( ता.इंदापुर ) भारत हा कृषिप्रधान देश आहे ,तर महाराष्ट्राचा शेतकरी आत्मा आहे.सालाबादप्रमाणे यंदाही वरुणराजाची हजेरी वेळेतच लागल्याने शेतकरी वर्ग आनंदी आहे .बैलं पोळा हा बैलांचा सण शेतकऱ्यांना अतिशय प्रिय असतो. शिरसटवाडी गावात हा श्रावणी अमावास्येला प्रत्येक घरात साजरा केला जातो.या उत्सवासाठी शेतकरी दोन दिवस राबत असतो. बैलपोळयाचे अदले दिवशी खांदे मळणी असते या दिवशी बैलांच्या शिंग तासणे, बैलांच्या वशीडीना तेल चढवून खांद्यावर, पाठीवर मायेने हात फिरवत मालीस केली जाते.तर वर्षे भर बैलगाडी ओढणारे बैलांना पोळ्याच्या दिवशी सुट्टी असते.बैलाना धुवून पुसून रंग लावून नवीन कासरे,वेसन,मोहरकी, शिंगांना हिंगूळ लावून त्यावर बेगिडे चिकटवून.घोगार गळ्यात बांधून सजावट केली जाते. गावात ग्रामदेवता ना फेरी मारून सनई चौघडा वाजत गाजत फटाके वाजवून मिरवणूक काढण्यात येते व घरी पुजा मांडून बैलाची लग्न लावून दिलं जातं . पुरणपोळी चा नैवेद्य दाखवला जातो. ॲड. नितीन कदम यांच्या घरी पणजोबा पासून चालत आलेली परंपरा कायम राखली जात आहे.


यावेळी घरातील महिला लहान मुले सहभागी असतात.पुजेवेळी बुवा साहेब कदम,
विनोद कदम, स्वप्नील कदम, संग्राम कदम.अमर कदम सौ.गणिता कदम,सौ प्रज्ञा कदम स्वप्नाली,सौ. राजश्री कदम यांनी श्रावण बैलपोळा साजरा केला अशी ॲड. नितीन कदम यांनी दिली.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!