November 21, 2024 2:16 pm

अमळनेर पुरवठा विभागाचा काळा बाजार थांबेना. मिली आणि जुली सामान्य जनतेचीच नाही तर प्रशासनाची देखील करताहेत दिशाभूल..

अपनी भाषा में पढ़े! Translate

अमळनेर पुरवठा विभागाचा काळा बाजार थांबेना. मिली आणि जुली सामान्य जनतेचीच नाही तर प्रशासनाची देखील करताहेत दिशाभूल..

अमळनेर : विक्की जाधव.
अमळनेर तालुक्यातील पुरवठा विभागात खाजगी एजंटांचा बेकायदा कारभार सुरू असून, नागरिकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट होत असलेल्याचे निर्दषणास येत आहे. पुरवठा विभागात खाजगी एजंटांनी नागरिकांकडून शिधा कार्ड नूतनीकरण, नाव वाढवणे किंवा कमी करणे यांसारख्या कामांसाठी मोठी रक्कम ग्रामीण भागातील सामान्या शेतकऱ्यां कडून उकळल्याच्या तक्रारी वाढत असुन यां मनमानी च्यां कारभारामुळे नागरिकांना हजारो रुपये खर्च करावे लागत आहेत. विशेषतः एनपीएच कार्ड धारकांना पीएचएच कार्ड मिळवून देण्यासाठी एजंट पैसे घेत असल्याचे आरोप आहेत. पैसे न दिल्यास नागरिकांना विभागातील कर्मचाऱ्यांकडून त्रास दिला जात असून, वशिला लावल्याशिवाय कोणतेही काम होत नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे. यां संदर्भात पुरवठा अधिकारी आणि तहसीलदार यांचे दुर्लक्ष आहे कां असा प्रश्न उपस्थित होत आहे.
बऱ्याच रेशन दुकानांमधील धान्य वाटप नियमितपणे होताना दिसत नाही. नवीन कार्ड मिळवण्यासाठी नागरिकांना पुरवठा विभागाच्या हेलपाटा मारावे लागत आहे एजंटां मार्फत भरमसाठ पैशाची मागणी होऊन पुरवठ्यात हें काळे धंदे चालू आहेत. यां संदर्भात सामान्यां जनतेत प्रचंड नाराजी चे सुरु ओढवत आहे. प्रशासन याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करत आहे कां असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!