न्यूज
ब्रेकिंग

IMG-20261103-WA0943 दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर, आदिवासी व वंचितांच्या न्याय हक्कांसाठी लोकसंघर्ष मोर्चा आक्रमक; मुख्यमंत्र्यांना २२ विषयांचे निवेदन!

IMG-20261103-WA0935 दुष्काळाच्या संकटात शेतकरी-शेतमजुरांची आर्थिक कोंडी; खासगी सावकारांसह बँका आणि फायनान्स कंपन्यांच्या जाचातून मुक्त करण्याची मागणी!

अमित शहांच्या भेटीनंतर राष्ट्रवादीत हालचालींना वेग; अमळनेरचे आमदार अनिल पाटलांना मुंबईतून बोलावणं!

WhatsApp Image 2026-11-02 at 7.53.54 PM बारामतीत खळबळ! कुस्तीच्या तालमीतील लाल मातीखाली ५ घातक शस्त्रे; चार आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी

WhatsApp Image 2026-11-02 at 7.53.54 PM बारामतीत खळबळ! कुस्तीच्या तालमीतील लाल मातीखाली ५ घातक शस्त्रे; चार आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी

आचारसंहिता लागण्यापूर्वी सर्व यंत्रणांनी मंजुर कामाच्या 100 टक्के वर्क ऑर्डर पूर्ण कराव्यात पालकमंत्री..

अपनी भाषा में पढ़े! Translate

आचारसंहिता लागण्यापूर्वी सर्व यंत्रणांनी मंजुर कामाच्या 100 टक्के वर्क ऑर्डर पूर्ण कराव्यात पालकमंत्री..

अमळनेर : विक्की जाधव
जिल्ह्यातील सर्व शाळामध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी सी.सी.टी.व्ही लावण्याची सूचना राज्य शासनाने दिली आहे. आम्ही जिल्ह्यातील गोरगरीबांची मुल, मुली ज्या जिल्हा परिषद शाळेत शिकतात तिथे सी.सी.टी.व्ही लावणार असल्याची माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. आज जिल्हा नियोजन भवन मध्ये जिल्ह्यातील सर्व विभागाच्या चालू वर्षाच्या नियोजन निधीच्या खर्चाच्या संदर्भात आढावा बैठक घेताना ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकित, अपर मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सूर्यवंशी, जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे, समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त योगेश पाटील उपस्थित होते.

आचारसंहिता लागण्यापूर्वी सर्व यंत्रणांनी मंजुर कामाच्या 100 टक्के वर्क ऑर्डर 31 सप्टेंबर पर्यंत पूर्ण कराव्यात असे निर्देश देऊन सन 2024-25 अंतर्गत दिनांक 5 सप्टेंबर 2024 पुर्वी जिल्हा परिषदेने उर्वरित 100 टक्के कामांना प्रशासकीय मान्यता द्याव्यात अशा सूचना पालकमंत्र्यांनी यावेळी दिल्या. राज्य शासकीय यंत्रणांनी दिनांक 31 ऑगस्ट पर्यंत 100 टक्के कामांना प्रशासकीय मान्यतेसाठी प्रस्ताव जिल्हा नियोजन समिती कार्यालयाकडे सादर करावेत जेणेकरुन आचारसंहितेपुर्वी कामे कार्यारंभ आदेश देऊन कामं सुरु करता येऊ शकतील. मागील कालावधीत ज्याप्रमाणे आपले सर्वांचे सहकार्य लाभले व 100% निधी खर्च झाला त्याप्रमाणे येत्या काळातही आपण सहकार्य करावे असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी केले.
मंजूर कामे दर्जेदार व मुदतीत पुर्ण करुन प्रशासकीय दिरंगाई व कामाच्या गुणवत्तेतील चालढकल खपवून घेतली जाणार नाही असे सांगून जिल्ह्यातील ओ.डी.आर.आणि व्ही. आर. रस्त्यांच्या दर्जोंन्नतीसाठी च्या कामांचे प्रस्तावशासनाकडे तात्काळ सादर करण्याच्या सूचनाही पालकमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!