उद्या कापिलेश्वर महादेव मंदिर येथे श्रवणमास निमित्त भाविकभक्तांना पार्थिव शिवलिंग पूजनाची मोठी संधी.
अमळनेर : विक्की जाधव
तालुक्यातील श्री कपिलेश्वर महादेव मंदिर येथे तापी पांझरा बोरी येथील त्रिवेणी संगमावर श्रावण मास निमित्त परम पूजनीय महामंडलेश्वर स्वामी हंसानंद तीर्थ महाराज यांच्या आशिर्वादाने तीन दिवसीय पार्थिव शिवलिंग पूजन कार्यक्रमाचे आयोजन उद्या करण्यात आले आहे. प. पू. महामंडलेश्वर स्वामी हंसानंद तीर्थ महाराज यांच्या उपस्थितीत विधिवत पूजन होणार असुन इच्छुक भाविकांनी स्व:ता चे पूजेचे साहित्य घेवून
कपिलेश्वर महादेव मंदिरावर सकाळी 8 वाजता उपस्थित राहावे. अशी विनंती मंदिरां कडून करण्यात आली आहे. अशी असेल कार्यक्रमाची रूपरेषा सकाळी 8 ते 9 पार्थिव शिवलिंग निर्माण, सकाळी 9 ते 12
पूजन आणि दु. 12 वाजे नंतर भोजन व्यवस्था मंदिरावरच राहील. तसेच अन्नदानासाठी ज्या भाविकांना मदत करावयाची असल्यास त्यांनी मंदिराचे पुजारी यांच्याशी संपर्क साधावा.