न्यूज
ब्रेकिंग

IMG-20261103-WA0943 दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर, आदिवासी व वंचितांच्या न्याय हक्कांसाठी लोकसंघर्ष मोर्चा आक्रमक; मुख्यमंत्र्यांना २२ विषयांचे निवेदन!

IMG-20261103-WA0935 दुष्काळाच्या संकटात शेतकरी-शेतमजुरांची आर्थिक कोंडी; खासगी सावकारांसह बँका आणि फायनान्स कंपन्यांच्या जाचातून मुक्त करण्याची मागणी!

अमित शहांच्या भेटीनंतर राष्ट्रवादीत हालचालींना वेग; अमळनेरचे आमदार अनिल पाटलांना मुंबईतून बोलावणं!

WhatsApp Image 2026-11-02 at 7.53.54 PM बारामतीत खळबळ! कुस्तीच्या तालमीतील लाल मातीखाली ५ घातक शस्त्रे; चार आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी

WhatsApp Image 2026-11-02 at 7.53.54 PM बारामतीत खळबळ! कुस्तीच्या तालमीतील लाल मातीखाली ५ घातक शस्त्रे; चार आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी

आदर्श माध्यमिक विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा….

अपनी भाषा में पढ़े! Translate

आदर्श माध्यमिक विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा….

 

(निलेश गायकवाड)

भिगवण ( ता.इंदापूर) येथील साईनाथ शिक्षण प्रसारक मंडळ संचलित आदर्श माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी शाहिद सलीम मुलाणी याने इंदापूर तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत 48 किलो खालील वजन गटात इंदापूर तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवून पुणे जिल्हा स्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल शाहिद मुलाणी याचा संस्थेच्या व विद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
इंदापूर येथे झालेल्या तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत 48 किलो खालील वजन गटात प्रथम क्रमांक मिळविला. त्याबद्दल साईनाथ शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेच्या वतीने शाहिद मुलाणी याचा विद्यमान अध्यक्ष डॉ. अमोल खानावरे यांनी रोख 1100 रुपये आणि श्री.सचिन बोगावत यांनी रोख 500 रुपये बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.चंद्रकांत खानावरे , अध्यक्ष डॉ. अमोल खानावरे, संचालक सचिन बोगावत , धनाजी थोरात, जय मल्हार तालीम चे वस्ताद दत्ता गायकवाड, अजय कोथमिरे , सलिम मुलाणी, सुनील गोरे मुख्याध्यापिका सुचिता साळुंके आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी वस्ताद दत्ता गायकवाड , सचिन बोगावत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच खेळाकडे लक्ष देणे गरजेचे असून विद्यार्थ्यांच्या खेळ कौशल्यास वाव मिळाल्यास राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू घडतील.असे मत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ चंद्रकांत खानावरे यांनी व्यक्त केले. तसेच शाहिद मुलाणी यास जिल्हा स्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी सर्व शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!