राजकीय वर्तुळात मोठ्या हालचालीनां वेग तर विशेषतः अमळनेर तालुक्याच्या राजकारणावर मंत्री अनिल पाटील यांचा पराभवासाठी मोठ्या मोठ्या दिग्गज नेत्यांचे लक्ष लागून.
अमळनेर : विक्की जाधव.
कट्टर मराठा जारंगे पाटील यांच्या समर्थकांचा यां पक्षात प्रवेश, पवार साहेबांचा दिलेला शब्द पाळण्यासाठीचं..
श्री गोगाजी नवमी उत्सव व छडी मिरवणूक निमित्त सर्व भाविक भक्तांना मनःपूर्वक शुभेच्छा.
शुभेच्छुक : श्री. बुद्धा भैया जाधव. श्री. विक्की भाऊ जाधव. श्री. विशाल भाऊ जाधव.
आगामी विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येत आहे तस तशा जळगाव जिल्ह्यात राजकीय वर्तुळात मोठ्या हालचालीनां वेग आला असुन विशेषतः अमळनेर तालुक्याच्या राजकारणावर मंत्री अनिल पाटील यांचा पराभवासाठी मोठ्या मोठ्या दिग्गज नेत्यांचे लक्ष लागून आहे.
तर मंत्री. आमदार. अनिल पाटील यांचेवर मराठा सामाज ही नाराज आहे.
मागील काही दिवसात अनिल पाटील यांच्यावर अविश्वास दाखवत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे असंख्य कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी जिल्ह्याभरातून सामूहिक राजीनामा दिला होता.
हें सत्र अजूनही सुरूच आहे. तर अमळनेर शहर आणि तालुक्यातील इतर पक्ष आणि अपक्ष उमेदवारांना पाठिंबा देण्यासाठी ग्रामीण भागातील उत्सुक कार्यकर्तेचीं जणु रांगच लागली आहे. येत्या विधानसभेत हे सत्र असेच सुरू राहिल्यास मंत्री अनिल पाटील यांचा पराभव निश्चितचं असेल असे.
अमळनेर शहरातील कट्टर मराठा जरंगे पाटील समर्थक सामाजिक कार्यकर्ते प्रवीण देशमुख , नरेंद्र पाटील , सलिम शहा यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत इतर कोणत्याही पक्षात न जाता आणि सध्याचे मंत्री अनिल पाटील यांच्या पराभव करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद बापूसाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. यावेळी अमळनेरचे शहराध्यक्ष श्याम पाटील , कैलास पाटील , मंगेश पाटील ( माजी जि.प. सदस्य ) , दिनेश पाटील , अक्षय चव्हाण , अनिरुध्द शिसोदे. आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
मागील काही काळात शरद पवार यांनी असे म्हटले होते की येणाऱ्या पुढील विधानसभेत अनिल पाटील दिसणार नाहीत याची आम्ही काळजी घेऊ..
यासंदर्भात पक्ष बांधणी कार्यकर्ते जोडणी आणि पवार साहेबांनी दिलेल्या शब्द पाळणे हेच सध्याचे उद्दिष्ट आहे. असे मराठा समाजाचे जारंगे समर्थक प्रवीण देशमुख यांनी सांगितले.