सावधान ! पॅरासिटामोल सह ‘या’ 156 औषधांवर केंद्र सरकारची मोठी कारवाई, आरोग्यास घातक असल्याने बंदी..
(विशेष प्रतिनिधी : वर्षा चव्हाण )
दिल्ली : सर्दी-पडसे, ताप आणि अंगदुखीसाठी वापरण्यात येणाऱ्या 156 हून अधिक औषधांवर आरोग्य मंत्रालयाकडून बंदी घालण्यात आली आहे. या संयुक्त औषधांचा वापर सातत्याने पेनकिलर म्हणजे अंगदुखी कमी करण्यासाठी करण्यात येतो. ही औषधं नागरिकांच्या आरोग्यासाठी योग्य नसल्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
यामध्ये पॅरासिटामोल, ट्रामाडोल, टॉरिन आणि कॅफीन यांच्या संयुक्त औषधांवर बंदी आणली आहे. याशिवाय एसिक्लोफेनाक 50एमजी + पॅरासिटामोल 125एमजी कॉम्बिनेशन, मेफेनामिक ॲसिड + पॅरासिटामोल इंजिक्शेन, सेट्रीजीन एचसीएल + पॅरासिटामोल + फेनिलफ्रीन एचसीएल, लेवोसेट्रीजीन + फेनिलफ्रीन एचसीएल + पॅरासिटामोल, पॅरासिटामोल + क्लोरफेनिरामाइन मॅलेट + फेनिल प्रोपेनोलामाईन, आणि कॅमिलोफिन डाइहाइड्रोक्लोराइड 25एमजी + पॅरासिटामोल 300एमजी या औषधांवर बंदी घालण्यात आली आहे.
ही औषधं कोणत्याही चाचणीशिवाय घटकांचे प्रमाण, मात्रा न तपासता थेट बाजारात विक्री होत असल्याचा प्रकार समोर आला होता. त्यानंतर समितीने ही औषधं बंदी घालण्याची शिफारस आरोग्य मंत्रालयाकडे केली होती. ही बंदी तात्काळ लागू करण्यात आली असल्याने औषध विक्री दुकानांवर ही औषधं विक्री करता येणार नाही.