January 30, 2025 11:48 am

मूग गिळून बसलेल्या असंवेदनशील सरकारचा वंचित बहुजन आघाडी दौंड कडून जाहीर निषेध.

अपनी भाषा में पढ़े! Translate

मूग गिळून बसलेल्या असंवेदनशील सरकारचा वंचित बहुजन आघाडी दौंड कडून जाहीर निषेध.
बदलापूर या ठिकाणी घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ दौंड पोलीसांना निवेदन.
प्रतिनिधी – विकी ओहोळ
8446119158
दौंड – बदलापूर या ठिकाणी दोन वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार घडन आणि मळद या ठिकाणी अल्पवयीन मुलीवर अत्याचार घडणं अशा महिला अत्याचाराच्या घटना वारंवार घडत असल्याने [देशात पुन्हा मनुस्मृती विचारसरणी डोकं वर काढत आहे की काय प्रश्न निर्माण झाला आहे]. बदलापूर येथे घडलेल्या घटनेतील आरोपी जितका जबाबदार आहे तितकेच त्या शाळेचे प्रशासन ज्यांनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला व बदलापुरातील पोलीस प्रशासन यांनी प्रकरण दाखल करण्यास विलंब केला हे तितकेच जबाबदार आहेत, तसेच दौंड तालुक्यात मळद या ठिकाणी घडलेली घटना याचा तपास दौंड पोलीस प्रशासनाने अतिशय जलदगतीने व कसून केला व आरोपीला कुठेही पलायन करण्याचे संधी दिली नाही त्याला तात्काळ अटक केली, त्यामुळे दौंड पोलीस स्टेशनचे पीआय डोके साहेब हे सिनेमातील सिंघम प्रमाणे काम करणारे खरे सिंघम आहेत, जे महिला मुलींच्या रक्षणासाठी दिवस-रात्र पाहत नाहीत असे प्रतिपादन दौंड तालुका अश्विन वाघमारे यांनी केले. यावेळी दौंड पोलीस स्टेशनचे पीआय डोके साहेब, एस आय आय पांडुरंग थोरात ,राऊत यांना निवेदन देऊन, सगळ्या शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, सदरील खटले फास्टट्रॅक कोर्टामध्ये चालवून आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे वतीने करण्यात आली. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष सैफभाई मन्यार, तालुका सचिव अजिंक्य गायकवाड, शहर सचिव राहुल नायडू, शहर उपाध्यक्ष संतोष कांबळे, लिंगाळी गणअध्यक्ष शुभम वानखेडे, शहर सचिव निलेश मिसाळ, जगदाळे वस्ती शाखाध्यक्ष राजेश ओहाळ, सुमित शिंदे, आनंद रणधीर इत्यादी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!