June 29, 2025 8:20 am

खाजगी व सरकारी शाळांमध्ये सी.सी.टीव्ही कॅमेरे बसवावे व सखी सावित्री समिती बाबतच्या तरतुदीचे अनुपालन, अंमलबजावणी करण्याची न्यू महाराष्ट्र पॅथर सेना महाराष्ट्र राज्य यांची मागणी.

अपनी भाषा में पढ़े! Translate

खाजगी व सरकारी शाळांमध्ये सी.सी.टीव्ही कॅमेरे बसवावे व सखी सावित्री समिती बाबतच्या तरतुदीचे अनुपालन, अंमलबजावणी करण्याची न्यू महाराष्ट्र पॅथर सेना महाराष्ट्र राज्य यांची मागणी.
प्रतिनिधी – विकी ओहोळ
8446119158
दौंड – महाराष्ट्र राज्यात बदलापूर व पुणे जिल्ह्यातील मळद गावात घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने पॅथर मा जयदीप बगाडे न्यू महाराष्ट्र पॅथर सेना व सहकारी यांनी आज दौंड पंचायत समिती चे गट शिक्षण आधिकारी यांना निवेदन दिले आहे. खाजगी शाळा व सरकारी शाळा मध्ये सी.सी.टीव्ही कॅमेरे बसवने,शिक्षकेतर कर्मचारी यांच्या नियुक्तीच्या अनुषंगाने घ्यावयाची काळजी,तक्रार पेटी, सखी सावित्री समिती बाबतच्या तरतुदीचे अनुपालन,विद्यार्थी सुरक्षा समितीचे प्रस्तावित गडन,राज्य सदस्य विद्यार्थी सुरक्षा आढावा समिती यांची अंमलबजावणी करण्याची मागणी न्यू महाराष्ट्र पॅथर सेना महाराष्ट्र राज्य व सहकारी यांनी गट शिक्षण अधिकारी महाजन याना निवेदन देऊन केली आहे. दि.०५ मे २०१७, दि.१० मार्च २०२२,दि.१३ मे २०२२ व दिनांक २१ ऑगस्ट २०२४ च्या परिपत्रक कायदयाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी मागणी केली आहे. खाजगी शाळा व सरकारी शाळा मध्ये हया कायदया प्रमाणे तातडीने गट शिक्षण आधिकारी यांनी पत्रव्यवहार करून अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे. जेणे करून अशा घटना भविष्यात घडणार नाही आणि जे संस्था चालक व मुख्याध्यापक हया शासनाच्या परिपत्रक , आदेशाचे उल्लंघन करतील त्याच्या वर या कायदयाने कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. हया निवेदनावर पॅथर मा जयदीप बगाडे न्यू महाराष्ट्र पॅथर सेना महाराष्ट्र राज्य दौंड पुणे, पांडूरंग गायकवाड माजी उपनगराध्यक्ष दौंड न.पा.दौंड,फिरोज तांबोळी,नितीन डाळीबे सामाजिक कार्यकर्ते,पांडूरंग गडेकर NDMJ चे पुणे जिल्हा निरिक्षक, नामदेव जठार,रमेश चावरिया संपादक व दौंड परिवर्तन विचार मंच दौंड,व इतर मान्यवर यांनी केली आहे. गट शिक्षण आधिकारी पंचायत समितीचे प्रतिनीधी एम.बी.पांचाळ कनिष्ठ सहायक यांनी आज दिनांक २३ ऑगस्ट २०२४ रोजी निवेदन स्विकारले आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!