जागृत सती माता देवस्थान येथे आज दरवर्षीप्रमाणे महाप्रसाद भंडाराच्या आयोजन.
अमळनेर : विक्की जाधव.
धरणगाव रस्त्यावरील जागृत सती माता देवस्थान तालुक्यातील चांदणी कुऱ्हे येथील दोन्ही रेल्वे रुळाच्या मध्यभागी असलेल्या ग्रामदैवत सती मातेच्या आज शुक्रवार दि. 23 ऑगस्ट रोजी दरवर्षी प्रमाणे होणार्या सार्वजनिक महाप्रसादाचा भंडाऱ्याचे आयोजन केले आहे. सकाळी 11 वाजेपासून होम हवन असून भाविक भक्तांनी यां शुभ प्रसंगाचा लाभ घ्यावा असे सती माता मंदिर ट्रस्ट कडून कळवण्यात आले आहे. हा कार्यक्रम दरवर्षी प्रमाणे ह्या ही वर्षी होणार आहे.
दर शुक्रवारी इच्छित मनोकामना पूर्ण करण्यासाठी अमळनेरच नव्हे तर जिल्ह्यभरातून भाविक मोठ्या श्रद्धने येथे येत असतात. पश्चिम रेल्वेच्या भुसावळ मंडळच्यां अमळनेर धरणगाव मार्गावर हे मंदिर असल्याने राज्य पर राज्यातील हजारो प्रवासी भाविक भक्त सती मातेचे दर्शन घेतल्याशिवाय पुढे जात नाही. इतकेच नव्हे तर या रेल्वे रूटवरून धावणाऱ्या प्रत्येक रेल्वे गाड्या या ठिकाणी आपला स्पीड कमी करून हॉर्न वाजवल्याशिवाय पुढे जात नाहीत.
मनातील इच्छा मनोकामना पूर्ण झाल्यावर भाविक भक्तांची या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. येथे एखादी मनातील गोष्ट नवस म्हणून केली तर ती नक्कीच पूर्ण होते अशी भाविकांची अख्यायिका आहे.
तर वर्षानुवर्ष गर्दी असणाऱ्या या ठिकाणी एकही रेल्वे अपघात झालेला नाही. असे सती मातेचे सत्व आहे, असे मंदिराचे पुजारी गुरव बाबा सांगतात.